राजकारणातल्या एखाद्या व्यक्तीवर राजकीय आरोप झाले तर त्याचं एवढं विशेष वाटत नाही. अशा व्यक्तीवर चोरीचे आरोप होतात, त्यावेळी मात्र ते विचित्र वाटतं. न्युझीलंडच्या (New Zealand) राजकारणात अशी एक घटना घडली आहे. यावेळी संसदेच्या आत गाणी किंवा भाषणे देण्यासाठी नाही तर चोरीचे आरोप झाल्यामुळे महिला खासदार चर्चेत आल्या आहेत. महागडे कपडे चोरल्याचे आरोप त्यांच्यावर झाले असून आरोपांनंतर त्यांनी राजीनामा दिला आहे (New Zealand MP resigns over shoplifting allegations).
गोलरिज घरमन (Golriz Ghahraman resigns as New Zealand Greens MP after shoplifting claims) असं या महिला खासदाराचं नाव आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. अशा प्रकारच्या आरोपांमुळे आपल्याला खूप दु:ख झालं असून तणावात असल्यांच म्हटलं आहे. दरम्यान तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांची कसून चौकशी केली जात आहे. ग्रीन पार्टीच्या या खासदार आहेत.
खासदार गोलरिज घरमन यांच्यावर बुटीक शॉपमधून लक्झरी कपडे चोरल्याचा आरोप आहे. गोलरिज यांच्यावर एकूण तीन आरोप आहेत. हे तिन्ही आरोप 2023 चे आहेत. चोरीचे दोन आरोप ऑकलंडमधील एका लक्झरी कपड्यांच्या दुकानातून आणि एक वेलिंग्टनमधील कपड्यांच्या किरकोळ दुकानातील चोरीचा आहे. या आरोपांनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू आहे. मात्र त्यापूर्वीच मानसिक त्रासाचे कारण देत त्यांनी राजीनामा दिला आहे. सध्या या प्रकरणाची न्यूझीलंडमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
Golriz Ghahraman, of the Green Party, is alleged to have stolen three times from two clothing stores – one in Auckland and the other in Wellington.
New Zealand MP resigns over shoplifting allegations
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements