बलात्काराचे आरोप झालेल्या नेत्याचे अश्लील व्हिडीओ व्हायरल
Mewaram Jain Viral Video : राजस्थानमधील बलात्कार प्रकरणात अडकलेले काँग्रेस नेते आणि बाडमेरचे माजी आमदार मेवाराम जैन यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दोन कथित अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. पीसीसी प्रमुख गोविंद सिंग दोतासारा यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात वृद्ध व्यक्तीसोबत एक महिला आणि एक लहान मुलगी आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती मेवाराम जैन असल्याचा दावा केला जात आहे. पीडितेने मेवराम जैन यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. उच्च न्यायालयाने सध्या त्यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. बाडमेरचे माजी आमदार मेवाराम जैन यांच्याविरोधात जोधपूरच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करताना एका विवाहित महिलेने दोन अश्लील व्हिडिओंचा उल्लेख केला होता. विधानसभा निवडणुकीतही हा मुद्दा जोरात मांडण्यात आला होता.
मेवाराम जैन हे बाडमेरचे ज्येष्ठ नेते आहेत. ते तीन वेळा आमदार राहिले आहेत. यावेळीही काँग्रेसने त्यांना तिकीट दिले होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ते अशोक हे गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेहलोत यांनी राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष करून कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला होता.
Mewaram Jain Viral Video
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements