बॅनर्सवर कन्नडचा वापर करा
बेळगाव—belgavkar : कन्नड संघटनांकडून इंग्रजी व मराठी फलकांना लक्ष्य केले जात असतानाच आता प्रशासनानेही त्यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी थेट बेळगावमधील प्रिंटींग प्रेस ओनर्स सदस्यांची बैठक बोलाविली. सरकारच्या नियमावलीप्रमाणेच यापुढे फलकांचे प्रिंटींग करावे लागेल, अन्यथा संबंधित प्रेस ओनर्सवर कारवाई करण्याचा इशाराच दिल्याने संतापाची लाट उसळली आहे.
अशा प्रकारांमुळे बेळगावमध्ये भाषिक तेढ निर्माण होत असून हे प्रकार वाढल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हॉटेल, दुकानं, आस्थापने, सहकारी पतसंस्था यांच्या नामफलकातील इंग्रजी व मराठीला विरोध दर्शविला आहे. सरकारच्या नियमावलीनुसार नामफलकावर 60 टक्के कन्नड भाषेचा उपयोग करून 40 टक्के इतर भाषांचा वापर करण्याची सूचना केली आहे. परंतु, बेळगावमध्ये बहुभाषिक मराठी असून व्यापारासाठी येणारे ग्राहक हे गोवा व महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे मराठी व इंग्रजी फलक लावणे व्यापारासाठी गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने आपल्या पद्धतीने दडपशाही सुरू केली आहे. बॅनर्स, प्रिंटर तसेच इतर प्रिंटींग प्रेसच्या मालकांची बैठक पोलीस प्रशासनाने घेतली. या बैठकीला पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, तसेच खडेबाजार व मार्केट पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
सरकारच्या नियमानुसार कन्नड भाषेचा वापर करावा. तसे न झाल्यास संबंधित प्रिंटींग प्रेस चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची तंबी देण्यात आली आहे. ही एक प्रकारची दादागिरी असून अशा प्रकारांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements