भरधाव ट्रेन आली अन्; रेल्वे अपघाताचा थरारक Video
Video : मोबाईलवर बोलण्याच्या नादात रेल्वे रुळ ओलांडणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची हृदयद्रावक बातमी नवी मुंबईतून समोर आली आहे. अनिलकुमार राजकुमार पटेल असे या तरुणाचे नाव आहे. तो जुईनगर रेल्वेस्थानकावरून रेल्वे रुळ पार करीत तुर्भेसाठी ट्रेन पकडण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, या रेल्वे अपघाताचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे; जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
लोक हल्ली मोबाईलमध्ये लोक इतके मग्न होतात की, त्यांच्या आजूबाजूला काय घडतेय याची त्यांनी कल्पना नसते. असाचं प्रकार या तरुणाच्या बाबतीत घडला. अनिलकुमार हा तरुण २५ डिसेंबर रोजी सकाळी कामावरून सुटल्यानंतर खारघर येथून तुर्भे रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी जुईनगर रेल्वेस्थानकावर उतरला होता. यावेळी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पुलाचा वापर न करता, तो रेल्वे रुळांवर उतरला.
शॉर्टकट मारून मोबाईलवर बोलता बोलता, तो रेल्वे रुळ क्रॉस करण्याचा प्रयत्न करीत होता; पण तो मोबाईलवर बोलण्यात इतका मग्न होता की, त्याला बाजूने भरधाव वेगाने आलेली ट्रेन लक्षात आली नाही. त्यामुळे मोबाईलवर बोलता बोलता तो ट्रेनखाली चिरडला गेला. या घटनेत त्याच्या शरीराचे तीन तुकडे झाले.
Location: Juinagar Railway Station Navi Mumbai#mumbailocal #Local #accident #CCTV pic.twitter.com/lf59Po6Sc5
— Anand N. Ingle (@anand_ingle89) January 17, 2024
रेल्वे अधिकारी गजेंद्र सिंह यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावली. मात्र, शरीराचे तीन तुकडे झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, @anand_ingle89 नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरुन या भीषण ट्रेन अपघाताचा व्हिडीओ शेअर केला आहे, जो आता सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
Man Crossing Railway Tracks Mobile Phone Video
Man Crossing Railway Tracks Mobile Phone Video
Man Crossing Railway Tracks Mobile Phone Video
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements