मल्याळम सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक प्रकाश कोलेरी त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले आहेत. केरळमधील वायनाड जिल्ह्यात ते राहत होते. त्यांचा मृतदेह मंगळवारी १३ फेब्रुवारी रोजी घरात आढळला. ते ६५ वर्षांचे होते. ‘मिझीईथलील कन्नीरुमयी’ या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळाली होती (Malayalam director Prakash Koleri found dead at his Wayanad home @Kerala).
प्रकाश कोलेरी वायनाड येथील त्यांच्या घरी एकटेच राहत होते. दोन दिवस शेजाऱ्यांनी त्यांना पाहिलं नव्हतं आणि त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती. त्यामुळे संशय आल्याने त्यांचे नातेवाईक तिथे पोहोचले आणि त्यांनी घरात जाऊन पाहिलं तर ते मृतावस्थेत आढळले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांच्या मृत्यूच्या कारणाबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
प्रकाश कोलेरी यांनी ‘मिझीईथलील कन्नीरुमयी’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात मुरली आणि आशा जयराम महत्त्वाच्या भूमिकेत होते. त्यांच्या ‘अवन अनंतपद्मनाभन’ या चित्रपटाचंही खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटात कन्नड अभिनेते-दिग्दर्शक रमेश अरविंद, सुधा चंद्रन, एमजी सोमण, मथू, राजन पी देव आणि टीजी रवी यांच्या भूमिका होत्या. १९९९ मध्ये ‘वरुण वरथिरिक्किला’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांनी सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला. त्यानंतर जवळपास १४ वर्षांनी ‘पट्टुपुस्तकम’ द्वारे त्यांनी दिग्दर्शनात पुनरागमन केलं होतं. ते उत्तम दिग्दर्शक तर होतेच याशिवाय ते चित्रपटाच्या कथाही लिहायचे.
Malayalam director Prakash Koleri found dead
Malayalam director Prakash Koleri found dead
Malayalam director Prakash Koleri found dead
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310