खासदार धैर्यशील मानेंना समितीने का दिला इशारा?
बेळगाव : बेळगावात मराठी फलकांवर ६० टक्के जागेत कन्नडमध्ये अक्षरे लिहिण्याची सक्ती केली जात आहे. यानंतर मराठी हद्दपार होते की, काय, अशी भीती वाटत आहे. याकडे आपण लक्ष द्यावे, अशी मागणी समिती नेत्यांनी खासदार माने यांच्याकडे केली. बेळगाव शहरात दोन महिन्यांपासून कन्नड सक्ती सुरू आहे. महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करूनही आमच्याकडे दुर्लक्षच केले आहे. आम्हाला महाराष्ट्राचाच आधार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तसेच संबंधित मंत्र्यांनी याकडे तातडीने लक्ष दिले नाही, तर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा म. ए. समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) नेत्यांनी सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांना दिला.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची माहिती देण्यासाठी खासदार माने हे गुरुवारी बेळगावातील मराठा मंदिर येथे आले होते. त्यावेळी त्यांची समिती नेत्यांनी भेट घेऊन हा इशारा दिला. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर व इतर समिती नेते उपस्थित होते.
सीमाभागावर १९५६ पासून विविध मार्गाने दडपशाही सुरु आहे. आमचा पाठीराखा महाराष्ट्र सरकार आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारचे याकडे दुर्लक्षच झाले आहे. महाराष्ट्रात जाण्याची आमची भावना तीव्र आहे. मात्र, महाराष्ट्र सरकार याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. सीमाभागात मराठी भाषिकांना दडपण्याचे काम सुरु आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. सरकारकडून कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्रास दिला जात आहे. महाराष्ट्र सरकारने आमच्या सोबत नेहमी राहिले पाहिजे. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दावा असतानाही बेळगावात कन्नडसक्ती केली जात आहे. याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली पाहिजे. यासाठी महाराष्ट्राचे सहकार्य असणे आवश्यक आहे, अशी मागणी खासदार माने यांच्याकडे केली.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements