53 वर्षांनी आला निर्णय
Lakshagriha-Mazar Dispute : ज्ञानवापी प्रकरणानंतर आता आणखी एका प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बरनावा येथे असलेल्या पांडवांच्या लक्षगृहाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या 53 वर्षांपासून सुरू असलेल्या या वादात न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल दिला आहे. लक्षगृह आणि मजारचा मालकी हक्क आता हिंदू पक्षाला देण्यात आला आहे. हे प्रकरण 1970 मध्ये मेरठच्या न्यायालयात दाखल करण्यात आले होते. त्याची सुनावणी सध्या बागपत जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू आहे.
बागपत दिवाणी न्यायाधीश शिवम द्विवेदी यांनी 1970 मध्ये सुरू झालेल्या खटल्यात हा निकाल दिला आहे. बरनावा येथील रहिवासी असलेल्या मुकीम खान यांनी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत मेरठच्या सरधना कोर्टात केस दाखल केली होती. यामध्ये त्यांनी लक्षगृहाच्या गुरुकुलाचे संस्थापक ब्रह्मचारी कृष्णदत्त महाराज यांना प्रतिवादी केले होते. या परिसरावर मुकीम खान यांनी वक्फ बोर्डाच्या मालकी हक्काचा दावा केला होता.
मुस्लीम पक्षाने न्यायालयात अपील दाखल केले असता त्यांनी प्रतिवादी कृष्णदत्त महाराज हे बाहेरचे असल्याचे सांगितले. मुस्लीम पक्षाने असेही म्हटले होते की, कृष्णदत्त महाराजांना मुस्लिम स्मशानभूमी नष्ट करुन हिंदूंचे तीर्थक्षेत्र बनवायचे आहे. विशेष म्हणजे, हिंदूंच्या बाजूने पुरावे सादर करणारे आणि मुस्लीम बाजूने खटला दाखल करणारे मुकीम खान आणि कृष्णदत्त महाराज, या दोघांचेही निधन झाले आहे. त्यांच्या जागी इतर लोक कोर्टात केस लढवत होते.
लक्षगृह आणि मजार-कब्रस्तान वादात एकूण 108 बिघे (60 एकर) जमीन आहे. सध्या न्यायालयाच्या निर्णयानंतर या जमिनीची संपूर्ण मालकी हिंदू बाजूकडे राहणार आहे. येथे पांडवकालीन एक बोगदादेखील आहे, ज्याद्वारे पांडव लक्षगृहातून बाहेर निघून गेल्याचा दावा केला जातो. याबाबत इतिहासकारांचे मतही घेण्यात आले आहे. या प्रकरणी इतिहासकार अमित राय म्हणाले होते की, या भूमीवर केलेल्या उत्खननात हिंदू संस्कृतीचे हजारो वर्षे जुने पुरावे सापडले आहेत.
महाभारतातील एक महत्वाचा प्रसंग ज्यात पांडव हे कौरवांनी बांधलेल्या महालात राहायला जातात. हा महाल म्हणजे पांडवांना मारण्यासाठी तयार केलेला ‘मास्टर प्लॅन’ असतो. या घराला लक्षागृह म्हटलं जातं. याची निर्मिती ‘लाख’ पासून केलेली असते आणि म्हणूनच ते लवकर पेट घेतं. अश्या पद्धतीने पांडवांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न कौरव करतात पण सुदैवाने पांडवांना हे लक्षात येऊन ते त्या महालातून सुखरूप बाहेर पडतात. यावेळी ते एका गुप्त भुयारी मार्गाने बाहेर पडतात असा महाभारतात उल्लेख आहे. आता महाभारत हजारो वर्ष जुनं असलं तरी असं म्हटलं जातं की हा भुयारी मार्ग आजही शाबूत आहे. याच भुयारातून कधीकाळी पांडव गेले होते. हे ठिकाण भारतातील महत्वाच्या पुरातत्व स्थळांपैकी एक आहे. या जागी आता उत्खनन होऊन काही गुपिते बाहेर पडण्याची शक्यता आहे. चला तर याबद्दल आणखी जाणून घेऊ ! तर, उत्तर प्रदेश, बागपत जवळील ‘बरनावा’ नामक गावी हे भुयार आहे. बरनावा हे नावच मुळात ‘वर्णाव्रत’ या महाभारत कालीन नावाचा अपभ्रंश आहे. वर्णाव्रत हे त्या पाच गावांपैकी एक आहे ज्या गावांची मागणी पांडवांनी केली होती. मेरठ येथील ‘हस्तिनापुर’ पासून ६६ किलोमीटरवर ही जागा आहे.
Mahabharat era Lakshagarh Barnawa Baghpat
Mahabharat era Lakshagarh Barnawa Baghpat
Mahabharat era Lakshagarh Barnawa Baghpat
Mahabharat era Lakshagarh Barnawa Baghpat
Mahabharat era Lakshagarh Barnawa Baghpat
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements