Kokatnur Yallamma Devi Yatra
बेळगाव—belgavkar Kokatnur Yallamma Devi Yatra : कोकुटनर (ता. अथणी, जि. बेळगाव) येथील श्री यल्लमा देवीची यात्रा (Kokatnur Yallamma Devi Yatra) शनिवारी (ता. 6) ते 11 जानेवारीपर्यंत साजरी करण्यात येणार आहे. यात्रेप्रसंगी कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील हजारो भक्त येत असतात. तसेच देवीला नवस फेडण्याच्या नावाने हजारो कोंबडी, बकरी, मेंढ्या आदींचा बळी देतात (Kokatnur Yallamma Devi Yatra).
राज्यात कर्नाटक प्राणी हत्या प्रतिबंधक अधिनियम १९५९ (Animal Slaughter Prevention Act) आणि नियम १९६३ आणि दुरुस्ती कायदा १९७५ अंतर्गत हा शिक्षापत्र गुन्हा आहे. यात्रा आणि अन्य दिवसांत देव आणि धर्माच्या नावाने प्राणी हत्या करण्यावर पूर्णपणे निर्बंध घेण्यात आले आहेत.
यासाठी या यात्रेदरम्यान होणारी प्राणी हत्या रोखण्यात यावी, अशी मागणी विश्व प्राणी कल्याण मंडळ, बसव धर्म ज्ञानपीठ आणि पशु प्राणी बळी निर्मूलन जागृती महासंघाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी केली आहे. केवळ कोकटनूर येथील यात्रेनिमित्त होणारी पशुबळी रोखण्यात न येता राज्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या यात्रा तसेच अन्य धार्मिक नावाच्या खाली होणारी प्राणी हत्येवर निर्बंध घालण्यात यावेत. तसेच यापुढे असे प्रकार होऊन नयेत, यासाठी असे प्रकार तात्काळ रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावित, अशी मागणी यावेळी दयानंद स्वामींनी केली आहे.
कोकटनूर येथील होणाऱ्या पशुबळीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. यात्रेत मोठ्या प्रमाणात पशुबळी होत असल्याने यावर निर्बंध घालावेत, अशी मागणी श्री दयानंद स्वामीजींनी निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी यात्रेतील पशु बळीवर निर्बंध घालण्याचा आदेश दिला आहे.
Belgaum Kokatnur Yallamma Devi Yatra belgavkar belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements