लॉटरीमध्ये जिंकले तब्बल 33 कोटी रुपये
संयुक्त अरब अमिराती येथे नोकरीच्या शोधात गेलेल्या एका भारतीय नागरिकाला करोडो रूपयांची लॉटरी लागली आहे. त्याच्या मुलाच्या वाढदिवसाची तारीख त्याच्यासाठी नशीब पालटणारी ठरली आहे. अबू धाबीच्या बिग तिकीट रॅफल ड्रॉमध्ये त्याने 15 दशलक्ष दिरहम (33 कोटी रुपये) जिंकले आहेत. केरळ येथील राजीव अरिकत असे या व्यक्तीचे नाव असून तो 40 वर्षांचा आहे.
5 फेब्रुवारी रोजी तिकीट क्रमांक 037130 ने त्याला करोडपती बनवले. राजीव UAE मध्ये आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन म्हणून काम करतो आणि गेल्या 10 वर्षांपासून अल-ऐन शहरात राहतो. राजीव अरिकत यांने खलीज टाइम्सशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, मी गेल्या तीन वर्षांपासून तिकीट खरेदी करत आहे, पण मी पहिल्यांदाच जिंकलो आहे. मी खूप आनंदी आहे आणि माझ्या कुटुंबातील सदस्य देखील खूप आनंदी आहेत. माझ्या पत्नीने मला तिकीट क्रमांक निवडण्यास मदत केली ज्यावर 7 आणि 13 अंक छापलेले होते. हे दोन अंक माझ्या मुलांच्या जन्मतारखा आहेत. मात्र, राजीवने ड्रॉमध्ये एकूण 6 तिकिटे काढली होती, त्यापैकी एक फुकट मिळाल्याने तो करोडपती झाला आहे.
राजीव अरिकत याने सांगितले, मला बिग तिकिटकडून एक खास ऑफर मिळाली. जेव्हा मी 2 तिकिटे घेतली, तेव्हा मला 4 मोफत मिळाली. अशा प्रकारे मोफत तिकिटाने माझ्या नशिब पालटले. राजीवला बिग तिकिट ड्रॉमध्ये जिंकलेली रक्कम त्याला 19 लोकांसोबत शेअर करावी लागणार आहे. कारण खरेदी केलेल्या दोन तिकिटांचे पेमेंट या सर्वांनी मिळून केले होते. अबू धाबी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिग तिकीट लॉटरी आयोजित केली आहे जी तेथील लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे राजीवने अद्याप या लॉटरीच्या विजेत्या रकमेबाबत कोणतीही विशिष्ट प्लॉन आखलेला नाही, परंतु त्याला ही लॉटरीची रक्कम इतर 19 लोकांसोबत समान प्रमाणात द्यायची आहे.
Kerala man wins 33 crore UAE Jackpot
Kerala man wins 33 crore UAE Jackpot
Kerala man wins 33 crore UAE Jackpot
Kerala man wins 33 crore UAE Jackpot
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310