जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी; रँकिंगमध्ये अव्वल स्थान
ICC Test Ranking : आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराहने अव्वल स्थान पटकवले आहे. इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहने 9 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे आयसीसी कसोटी बॉलिंग रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे (Jasprit Bumrah becomes first India pacer to top ICC Test Rankings).
ICC च्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर 1 स्थान पटकावणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिला आशियाई जलदगती गोलंदाज ठरला आहे. 9 विकेट्स घेणाऱ्या जसप्रीतला IND vs ENG दुसऱ्या कसोटीत मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला गेला होता आणि त्याने आयसीसी क्रमवारीत तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान पटकावले. आर अश्विनची दोन स्थानांनी घसरण झाली आणि तो पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून अश्विन अव्वल स्थानावर होता, परंतु इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याला तीन विकेट घेता आल्या होत्या. त्यामुळे त्याची घसरण झाली, दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा दुसऱ्या स्थानावर कायम आहे. यापूर्वी जसप्रीत कसोटी क्रमवारीत 3 स्थानांच्या वर कधीच सरकला नव्हता.
यापूर्वी आर अश्विन, रवींद्र जडेजा व बिशन सिंग बेदी यांनी आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. पण, जसप्रीत हा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज आहे. भारताचा फलंदाज यशस्वी जैस्वाल यानेही फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. दुसऱ्या कसोटीत त्याने 209 धावांची खेळी केली होती. तो 37 स्थानांच्या सुधारणेसह 29व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
Jasprit Bumrah top ICC Test Rankings
Jasprit Bumrah top ICC Test Rankings
Jasprit Bumrah top ICC Test Rankings
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements