Ishan Kishan Ignores BCCIs Warning
BCCI vs Ishan Kishan: बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी टीम इंडियामध्ये (Team India) समाविष्ठ नसेलेल्या सर्व खेळाडूंनी रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy) सामने खेळणं अनिर्वाय असल्याचा फतवा काढला. पण टीम इंडियाचा स्टार खेळाडू ईशान किशननं (Ishan Kishan) मात्र, बीसीसीआयच्या (Board of Control for Cricket in India (BCCI)) फतव्याकडे कानाडोळा केला आहे. आजपासून (शुक्रवार) सुरू झालेल्या झारखंड विरुद्ध राजस्थान (Jharkhand vs Rajasthan) रणजी सामन्यात तो आपल्या राज्य संघासाठी खेळताना दिसेल, असं बोललं जात होतं. पण ईशान किशन झारखंडच्या संघातून खेळत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
बीसीसीआयच्या सूचनेनुसार, तो यावेळी झारखंडच्या प्लेइंग-11 चा भाग असेल, असं मानलं जात होतं. पण ईशाननं बीसीसीआयच्या सूचनेकडे कानाडोळा केल्याचं दिसत आहे. ईशान किशनच्या या वृत्तीवर बीसीसीआय काय कारवाई करतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ईशानच्या या वागणुकीबाबत सध्या क्रिकेट विश्वात चर्चा सुरू आहेत. ईशान किशनचं हे वागणं म्हणजे, एक प्रकारची बंडखोरी असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ईशान किशननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आपलं नाव मागे घेतलं होतं. त्यानंतर बीसीसीआयनं सांगितलं होतं की, ईशाननं वैयक्तिक कारणांमुळे हा ब्रेक घेतला आहे.
मात्र, नंतर इंडियन एक्स्प्रेसमधील एका वृत्तानुसार, ईशाननं मानसिक थकव्यामुळे संघातून माघार घेतल्याचं समोर आलं होतं. ईशान किशन टीम इंडियासोबत बराच काळ होता. दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यात ईशान किशनला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली जात होती. कारण टीम इंडियामधील एक महत्त्वाचा खेळाडू त्यावेळी जखमी झाला होता. त्याचवेळी ईशान किशननं मानसिक थकव्याचं कारण देत माघार घेतली. त्यानंतर एक मीडिया रिपोर्ट समोर आला होता. त्या रिपोर्टमधील दाव्यानुसार, मानसिक थकव्याचं कारण देत ईशान किशननं दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. पण त्यावेळी ईशान किशन परदेशात सुट्टी एन्जॉय करत होता. ईशानच्या अशा वागण्यानं बीसीसीआय नाराज होती. त्यानंतर बीसीसीआयनं ईशान किशनला रणजी क्रिकेट खेळण्याचा सल्लाही दिला होता.
दरम्यान, ईशान किशननं बीसीसीआयचं म्हणणं मानलं नाही आणि जानेवारीपासून आतापर्यंत एकही रणजी सामना खेळलेला नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशान किशन सध्या पर्सनल ट्रेनिंगवर भर देत आहे. अलीकडे तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यासोबत आयपीएलची तयारी करताना दिसला. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही स्पष्ट केलं होतं की, जेव्हा ईशान देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या धावा करेल, तेव्हाच त्याच्या टीम इंडियात पुनरागमनाचे दरवाजे उघडतील.
ईशान किशनच्या या वृत्तीमुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतही संधी मिळाली नाही. इंग्लंड कसोटी मालिकेतही निवड समितीनं त्याच्या जागी ध्रुव जुरेलला संधी दिली होती. आता ईशानच्या बंडखोर वृत्तीवर बीसीसीआय काय पावलं उचलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ishan Kishan Ignores BCCIs Warning
Ishan Kishan Ignores BCCIs Warning
Ishan Kishan Ignores BCCIs Warning
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements