तरीही अगदी सुस्थितीत iPhone
iPhone fell down 16000 feet from Alaska plane after window blew
आपले फोन अगदी मजबूत असतात असा दावा अॅपल कंपनी सातत्याने करत असते. मात्र, कित्येक वेळा अगदी थोड्या उंचीवरुन पडूनही आयफोनच्या स्क्रीनला तडा गेल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे यूजर्स या बाबतीत iPhone ला ट्रोल करत असतानाच, एका घटनेमुळे सर्व ट्रोलर्सची बोलती बंद झाली आहे. कारण तब्बल 16000 फुटांवरून खाली पडलेला एक आयफोन अगदी सुस्थितीत आढळून आला आहे (iPhone falls 16000 feet from flight).
काही दिवसांपूर्वी अलास्का एअरलाईन्सच्या एका विमानाचा दरवाजा हवेतच उघडला होता. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. यादरम्यान विमानातील एक आयफोन बाहेर उडून गेला होता. हा आयफोन जमीनीवर पडला, मात्र तरीही तो सुस्थितीत आणि चालू होता (Alaska Airlines ASA 1282 flight, en route from Portland, Oregon, to Ontario, California, experienced a terrifying mid-air window-shattering incident).
बार्न्स रोड (Barnes Road) नावाच्या एका ठिकाणी राहणाऱ्या सीनाथन बेट्स नावाच्या एका व्यक्तीला हा फोन मिळाला. या फोनचं कव्हर, स्क्रीन प्रोटेक्टर अशा गोष्टीही सुस्थितीत होत्या. बेट्स याने आपल्या एक्स हँडलवरुन याबाबत माहिती दिली. तसंच या फोनचा फोटोही त्याने शेअर केला. मला रस्त्याच्या कडेला हा आयफोन मिळाला. हा आयफोन एअरप्लेन मोडवर आहे, यामध्ये अर्धं चार्जिंग शिल्लक आहे. तसंच अलास्का एअरलाईन्सच्या ASA1282 या फ्लाईटचं बॅगेज क्लेम असणारा ईमेल यात ओपन आहे. तब्बल 16 हजार फूट उंचीवरुन पडूनही हा फोन सुस्थितीत आहे, असं बेट्सने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आपल्या पोस्टमध्ये तो पुढे लिहितो, “मी याबाबत माहिती देण्यासाठी NTSB अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, मला असं समजलं की विमानातून पडून सुस्थितीत सापडलेला हा दुसरा फोन आहे. या विमानाचं दार अजूनही मिळालं नाही..”
यावर नेटकऱ्यांनी अगदी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. “या फोनचं कव्हर आणि स्क्रीन प्रोटेक्टर कोणत्या कंपनीचा होता हे फक्त सांगा”, “शक्यच नाही! माझा आयफोन टेबलवरुन खाली पडला होता आणि खराब झाला”, “माझा तर खिशातून पडला तरी खराब झाला होता..” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया एक्स यूजर्सनी दिल्या आहेत.
iPhone falls 16000 feet from flight
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements