धनत्रयोदशीला नवी कोरी कार घेतलेली, अपघातात ६ जणांचा जीव गेला
Dehradun car accident : 6 students killed, 1 injured as car crashes into truck
उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये ६ तरुणांचा मृत्यू झाला आहे. इनोव्हा हायक्रॉस पुढे जाणाऱ्या ट्रकवर आदळून हा अपघात झाला आहे. यात कारचा चेंदामेंदा झाला असून फोटोही भयावह आहे. हा अपघात मध्यरात्री २ च्या सुमारास झाला आहे.
सहा जणांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी आहे. धनत्रयोदशीलाच ही कार खरेदी करण्यात आली होती. या कारचा नंबरही आला नव्हता, असे पोलिसांनी सांगितले आहे. ओएनजीसी क्रॉसिंगवर एक कंटेनर उजव्या बाजुला वळत असताना बल्लूपूरहून वेगाने येत असलेल्या Innova HyCross ने धडक दिली. यात कारच्या चिंधड्या झाल्या. ही धडक एवढी भयानक होती की दोन तरुणांचे शीर धडापासून वेगळे झाले. तर एका तरुणीचे डोके आदळून फुटले. हा अपघात एवढा भयानक होता की अनेकांच्या अंगावर शहारे आले होते.
या अपघातातील सर्वजण देहरादूनचेच असून १९ ते २४ वयोगटातील तरुण, तरुणी आहेत. अतुल अग्रवाल हा या गाडीचा मालक होता, त्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्याचे वडील फटाक्यांचे मोठे व्यापारी आहेत. एका बीएमडब्ल्यू कारसोबत रेसिंग सुरु होती, असाही संशय अनेकांनी व्यक्त केला आहे. तसेच मद्य प्राशन केलेले किंवा सनरुफ बाहेर आलेले असावेत असेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर पोलिसांनी तपास करत असल्याचे म्हटले आहे.
Dehradun car accident
Dehradun car accident
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements