BCCI set to send India players early for T20 World Cup 2024 whose teams fail to qualify for IPL playoffs
T20 World Cup 2024 : यंदा टी-20 वर्ल्ड कपचा थरार 1 जूनपासून यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये रंगणार आहे. आयपीएलनंतर लगेचच ही स्पर्धा सुरू होणार आहे. आयपीएल 22 मार्चपासून सुरू होऊ शकते, तर मे च्या शेवटच्या आठवड्यात संपू शकते. यानंतर 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे.
BCCI likely to send India players early for T20 World Cup 2024!#T20WorldCup #IPL2024 #CricketTwitter #RohitSharma #ViratKohli pic.twitter.com/JDnhvQQpP8
— Jega8 (@imBK08) February 13, 2024
आता बीसीसीआयने याबाबत स्वतःची खास योजना बनवली आहे. आयपीएलच्या मध्यभागी बोर्ड खेळाडूंना तयारीसाठी न्यूयॉर्क (यूएसए) येथे पाठवणार असल्याचे पीटीआयच्या अहवालातून समोर आले आहे. यासाठी जे खेळाडू वर्ल्ड कप खेळणार आहेत ते अमेरिकेला रवाना होतील.
बीसीसीआय टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय खेळाडूंना आधी न्यूयॉर्कला पाठवू शकते, असे पीटीआयच्या अहवालातून समोर आले आहे. यासाठी, ज्या खेळाडूंचे संघ बाद फेरीसाठी पात्र ठरू शकणार नाहीत ते आयपीएल प्ले-ऑफ दरम्यान यूएसएला जातील. टीम इंडिया 5 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करेल आणि पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळेल. ही स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार असून त्यासाठी सर्व 20 संघांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्यांची स्क्वॉडची घोषणा करावी लागणार आहेत. त्यानंतर 20-22 मे पर्यंत संघ त्यांच्या संघात अंतिम बदल करू शकतील.
यानंतर जे काही बदल घडतील, त्यासाठी आयसीसीकडून विशेष परवानगी घ्यावी लागेल. आयपीएलचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु स्पर्धेच्या मध्यभागी पहिल्या टप्प्यानंतर वर्ल्ड कपचा संघ जाहीर केला जाईल हे निश्चित आहे. भारतीय संघ 5 जूनला आयर्लंडविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल, त्यानंतर 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळेल. भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि यूएसए ग्रुप ए मध्ये आहेत. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होत असून सर्व 5-5 गटात विभागले गेले आहेत. प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात 4-4 सामने खेळावे लागतात.
Indian players New York before T20 World Cup
Indian players New York before T20 World Cup
Indian players New York before T20 World Cup
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements