Under 19 World Cup भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना
India vs Bangladesh, U19 World Cup 2024 : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांनी जबरदस्त खेळी केली. दोन गडी झटपट बाद झाल्यानंतर दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 116 धावांची भागीदारी केली. आठव्या षटकांपासून 32 व्या षटकापर्यंत या दोघांनी बांगलादेशी गोलंदाजांचा घाम काढला. भारताने 50 षटकात 7 गडी गमवून 251 धावा केल्या. त्यामुळे 25 व्या षटकात बांगलादेशचे गोलंदाज काकुळतीला आले होते. त्यामुळे भारतीय कर्णधाराला डिवचण्याचा प्रयत्न करत होते. कर्णधार उदय सहारन यानेही मागे पुढे न पाहता थेट बांगलादेशी खेळाडूंना भिडला. यामुळे पंचांना मध्यस्थी करण्याची वेळ आली.
बांगलादेशकडून 25 वं षटक अरिफुल इस्लाम टाकत होता. कर्णधार उदय सहारन फलंदाजी करत होता आणि दुसऱ्याच चेंडूवर स्वीप केला आणि एक धाव घेतली. त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा क्रिझवर परतला. या दरम्यान अरिफुल इस्लामने सहारनला डिवचलं. त्यानंतर भारतीय कर्णधार भडकला तेव्हा बांगलादेशचे इतर खेळाडूंनी धाव घेतली (India U-19 captain and Bangladesh player in heated argument).
— Sitaraman (@Sitaraman112971) January 20, 2024
सहारनने पंचांना थेट सांगितलं की, बांगलादेशी खेळाडू वारंवार अपशब्द वापरून डिवचत आहेत. तसेच अरिफुलला थेट बोट दाखवत दम भरला. यावेळी समालोचकांनी सांगितलं की, अरिफुलने सुरुवात केली आणि त्यानंतर सहारन भडकल्याचं दिसून आलं. पण बांगलादेशी गोलंदाजाने नेमकं असं काय बोलला ते काही कळू शकलं नाही. मात्र अपशब्द वापरल्यानेत भारतीय कर्णधार सहारन भडकला असावा. भारताकडून आदर्श सिंगने 76, तर कर्णधार उदय सहारन याने 64 धावांची खेळी केली.
बांगलादेशने 2020 अंडर 19 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारताला पराभूत केलं होतं. तसेच पहिल्यांदाच जेतेपद आपल्या नावावर केलं होतं. तेव्हाही भारत आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये वाद झाला होता. सामन्यानंतर हातमिळवणी करताना भारतीय खेळाडूने बांगलादेशी खेळाडूला धक्का दिला होता. तत्पूर्वी त्या खेळाडूने अपशब्द वापरले होते. त्यामुळे वाद रंगला आणि दोन्ही खेळाडू भिडले होते. युवा खेळाडूंच्या अशा वर्तनामुळे दिग्गज खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती.
India U-19 captain and Bangladesh player
India U-19 captain and Bangladesh player
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements