IND vs ENG 2nd Test | इंग्लंडचा हिशोब क्लिअर
जसप्रीत बुमराहच्या 9 विकेट्स
India beat England by 106 runs
India vs England 2nd Test, Day 4 : India beat England by 106 runs to level series at 1-1 in Visakhapatnam : टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना चौथ्याच दिवशी जिंकला आहे. टीम इंडियाने इंग्लंडवर 106 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंड 292 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने या विजयासह पहिल्या सामन्यातील पराभवाची परतफेड केली. तसेच 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.
इंग्लंडच्या Bazball ची हवा भारतीय गोलंदाजांनी काढून ही कसोटी 102 धावांनी जिंकली. भारताच्या 398 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चांगला खेळ केला होता, परंतु आर अश्विनने मोक्याच्या क्षणी विकेट्स घेतल्या, त्यात जसप्रीत बुमराहने पुन्हा प्रभाव पाडला आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यात बुमराहने (45/6 व 46/3) एकूण 9 विकेट्स घेतल्या. या कसोटीत यशस्वी जैस्वालचे (209) द्विशतक अन् शुबमन गिलच्या (104) शतकाने भारताला फलंदाजीत आधार दिला.
झॅक्र क्रॉली आणि बेन डकेट (28) यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. आर अश्विनने ही जोडी तोडली. रेहान अहमदने (23) अक्षर पटेलच्या चेंडूवर पायचीत झाला. आर अश्विनने ऑली पोप (23) व जो रूट (16) यांना माघारी पाठवले. झॅक क्रॉली चांगला खेळत होता आणि कुलदीप यादवने त्याचा अडथळा दूर केला. क्रॉली 132 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकारांसह 73 धावांवर बाद झाला. बेन स्टोक्स व बेन फोक्स या जोडीने डोकेदुखी वाढवली होती, परंतु श्रेयस अय्यरने भन्नाट डायरेक्ट हिट करून स्टोक्सला (11) रन आऊट केले.
फोक्स व टॉम हार्टली यांनी 55 धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या आशा जीवंत राखल्या होत्या. पण, रोहितने लगेच जसप्रीतला गोलंदाजीला आणले आणि जसप्रीतने परतीच्या षटकात फोक्सला (36) कॉट अँड बोल्ड केले. मुकेश कुमारने सामन्यातील पहिली विकेट घेताना शोएब बशीरला (0) माघारी पाठवले. बुमराहने टॉम हार्टलीचा (36) त्रिफळा उडवून इंग्लंडचा डाव 292 धावांवर गुंडाळला. जसप्रीतने 46 धावांत 3 आणि अश्विनने 72 धावांत 3 विकेट्स घेतल्या.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.
India beat England by 106 runs vs England 2nd Test
India beat England by 106 runs vs England 2nd Test
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements