IND vs ENG Test series
India squad announced for final 3 Tests against England
इंग्लंडविरुद्धच्या उर्वरीत 3 कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ आज जाहीर करण्यात आला आहे. या संघात भारताच्या निवड समितीने मोठे बदल केले आहेत, पण त्याचबरोबर भारताच्या तीन मॅचविनर खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आलेले नाही. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आाल होता. या दोन्ही कसोटी सामन्यांमधून विराट कोहलीने विश्रांती घेतली होती.
पण पहिल्या कसोटी सामन्यानंतर लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांना दुखापत झाली होती. त्यामुळे या दोघांनाही दुसरा कसोटी सामना खेळता आला नव्हता. त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा दुखापतीमुळे पहिले दोन्ही कसोटी सामने खेळू शकला नव्हता. त्यामुळे आता या तिसऱ्या कसोटी सामन्यात या तिघांचे पुनरागमन होते का, याची उत्सुकता सर्वांनाच होती.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहली या पुढील तीन कसोटी सामन्यांत खेळणार का, याची उत्सुकता सर्वांना होती. कारण कोहली हा भारतामध्ये नव्हता आणि यासाठी त्याने आपले वैयक्तिक कारण दिले होते. यापूर्वी कोहली हा तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर आली होती, पण पाचव्या सामन्याबाबत मात्र संभ्रमता होती. पण आता भारताचा संघ जाहीर झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात येणार, असेही म्हटले जात होते. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याचीही बातमी समोर आली होती. पण श्रेयसला दुखापत झाली नसून तो जर संघाबाहेर गेला तर त्याचे अपयश हेच कारणीभूत असेल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
भारतीय संघात कोणाचे पुनरागमन : भारताच्या या संघात लोकेश राहुलचे पुनरागमन होणार, असे म्हटले जात होते. कारण राहुलची दुखापत जास्त गंभीर नव्हती. पण जडेजा आणि शमी यांची दुखापत गंभीर असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे या सामन्यात फक्त राहुल परतण्याची चिन्हं होती. राहुल संघात परतल्यावर तो श्रेयस अय्यरची जागा घेईल, असेही म्हटले जात होते. कारण श्रेयस चांगल्या फॉर्मात दिसत नाही. दुसरीकडे शुभमन गिल फॉर्मात आला आहे आणि यशस्वी जैस्वाल सातत्याने धावा करत आहे. त्यामुळे राहुलला खेळण्यासाठी श्रेयसला संघाबाहेर जावे लागेल, असे म्हटले जात होते. यावेळी भारतीय संघाची निवड करताना बऱ्याच गोष्टींची विचार करण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी समतोल भारतीय संघ निवडण्यात आला आहे.
Squad : Rohit Sharma (C), Jasprit Bumrah (VC), Yashasvi Jaiswal, Shubman Gill, KL Rahul*, Rajat Patidar, Sarfaraz Khan, Dhruv Jurel (WK), KS Bharat (WK), R Ashwin, Ravindra Jadeja*, Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Mohammed Siraj, Mukesh Kumar, Akash Deep
*subject to fitness
The third Test will start from February 15 in Rajkot, while the fourth Test kickstarts in Ranchi from February 23 and fifth and final Test of the series will be played in Dharamsala from March 7.
IND vs ENG Test series India squad 3 Tests
IND vs ENG Test series India squad 3 Tests
IND vs ENG Test series India squad 3 Tests
IND vs ENG Test series India squad 3 Tests
IND vs ENG Test series India squad 3 Tests
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements