‘या’ खेळाडूंना मिळाली संधी
Rohit Sharma संघाचे नेतृत्व करणार
IND vs ENG India vs England Test series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासाठी बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. जसप्रीत बुमराहला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशकडून खेळणारा 22 वर्षीय यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलचा पहिल्यांदाच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. केएल राहुल-केएस भरत यांच्यानंतर संघात यष्टीरक्षक म्हणून तो तिसरा खेळाडू असणार आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी फलंदाजांना या संघात स्थान मिळालेले नाही. इशान किशनलाही संधी मिळालेली नाही.
याचबरोबर,वेगवान गोलंदाजीत आवेश खानला संधी मिळाली आहे. तसेच, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार हे वेगवान गोलंदाज भारतीय संघात आहेत. याशिवाय, इंग्लंडपेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी भारतीय संघात फिरकी गोलंदाजांवर अधिक भर देण्यात आला आहे. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्याशिवाय कुलदीप यादवचाही संघात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या मालिकेसाठी इंग्लंडने डिसेंबर २०२३ मध्येच आपला संघ जाहीर केला होता.
पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद यादव. , मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि आवेश खान या खेळांडूचा समावेश आहे.
India vs England Test series 2024: Full squad list for first two Test matches
IND vs ENG 2024: India squad for 1st 2 Tests announced
IND vs ENG India vs England Test series
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements