India vs England 3rd Test 2023/24
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करत आहे. रवींद्र जडेजा आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांने चांगली खेळी खेळली. या खेळीदरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने मोठी चूक केली आहे. याचे परिणाम संपूर्ण संघाला भोगावे लागले आहेत. रविचंद्रन अश्विन फलंदाजी करत असताना 102 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही चूक झाली. यासाठी पंचांनी भारतीय संघावर 5 धावांचा दंड ठोठावला आहे (IND v ENG, 3rd Test : India penalised 5 runs after R Ashwin runs on protected area of pitch, argues with umpire)
इंग्लंडचा गोलंदाज रेहान अहमद 102 वे ओव्हर टाकायला आला. यादरम्यान षटकातील चौथ्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने शॉट मारला आणि एकेरी धाव घेतली. या वेळी त्याने मोठी चूक केली. अश्विन खेळपट्टीच्या मधून पळत गेला. कोणत्याही खेळाडूला विकेटच्या मधून पळण्याची परवानगी नाही, यामुळे खेळपट्टी खराब होते. असे असूनही, अश्विनने एकेरी घेण्यासाठी खेळपट्टीच्या मधून पळाला, त्यामुळे पंच जोएल विल्सन यांनी भारतीय संघावर 5 धावांचा दंड ठोठावला.
— Kirkit Expert (@expert42983) February 16, 2024
आता जेव्हा इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरेल तेव्हा त्यांना 5 मोफत धावा मिळतील. इंग्लंडचा डाव 5-0 ने सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत अश्विनची एक छोटीशी चूक संपूर्ण संघाला महागात पडली आहे. हा सामना जिंकणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो मालिकेत 2-1 अशी आघाडी घेईल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका अद्याप अनिर्णित राहिली आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने भारताला धक्का दिला. यानंतर भारताने मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही दमदार पुनरागमन करत विशाखापट्टणम कसोटी जिंकली.
IND v ENG 3rd Test India penalised 5 runs
IND v ENG 3rd Test India penalised 5 runs
IND v ENG 3rd Test India penalised 5 runs
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements