वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी नोकरीतून निवृत्ती
गुगल कंपनीत नोकरी मिळवणं सोपं नाही. यासाठी उच्च शिक्षण आणि कौशल्याची आवश्यकता आहे. गुगलची (Google) हायरिंग प्रोसेस खूप कठीण आहे. अनेक इंटरव्ह्यू राउंडनंतर सर्वोत्तम उमेदवाराची निवड केली जाते. प्रतिभा आणि कौशल्य असेल तर अगदी तरुण वयातही गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळते. गुगलमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाची कहाणी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत. ज्या वयात नोकरीची सुरुवात होते. त्या वयात या तरुणाने निवृत्ती घेतली आहे. या तरुणाचं नाव आहे डॅनिअल जॉर्ज (IIT-Bombay alumnus Daniel George). डॅनिअलला गुगलमध्ये वार्षिक 2.2 कोटींचं पॅकेज देण्यात आलं होतं.
डॅनिअल जॉर्जने 2015 मध्ये आयआयटी बॉम्बेमधून (IIT-Bombay alumnus Daniel George) इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. त्यानंतर त्याला गुगलकडून मोठ्या पगाराची नोकरीची ऑफर देण्यात आली. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी डॅनिअल जॉर्जकडे इतका पैसा झाला की त्याने नोकरीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. डॅनिअल जॉर्ज एआय स्पेशलिस्ट आहे. नोकरीनंतर आता डॅनिअर जॉर्ज फायनान्स आणि टॅक्सचं शिक्षण घेत आहे.
जितके पैसे कमवत होता, त्यातले 50 टक्के रक्कम कर द्यावा लागत असल्याचं डॅनिअलने सांगितलं. त्यामुळे डॅनिअलने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे नोकरी करताना मिळकतीच्या 10 टक्केही खर्च होत नसल्याचं डॅनिअलने सांगितलं. डॅनिअल कार्यालयात जाण्यासाठी सायकलचा वापर करायचा, त्यामुळे त्याने कधी कार विकत घेतली नाही. गुगलच्या कार्यालयातच तो वेळचं जेवण करायचा. त्यामुळे जेवणाचे पैसेही वाचत होते. सिलिकॉन व्हॅलीत घर विकत घेणं महाग असल्याने त्याने काही मित्रांबरोबर एक प्लॅट भाड्याने घेतला होता.
अनेक मित्रांनी महागड्या कार खरेद केल्याचं डॅनिअल सांगतो. पण आपण पगारातील मोठा हिस्सा गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळ्या योजनांमध्ये त्यांना पैसै गुंतवले याचा त्याला चांगला परतावाही मिळतोय. अमेरिकेत असतानाच त्याची ओळख त्याची भावी पत्नीशी झाली. ती गुगलमध्ये AI सायंटिस्ट आहे.
जून 2020 मध्ये जेपी मॉर्गनने डॅनिअलला एआय प्रोजेक्टचं नेतृत्व करण्याची संधी दिली. यासाठी पगारही दुप्पट दिला. पण आपण कधीच वायफळ खर्च केला नसल्याचं डॅनिअल सांगतो. आपल्या घरात काही कपडे, एक गादी आणि एक 65 इंच टीव्ही इतकीच संपत्ती असल्याचं तो सांगतो. वयाच्या 27 व्या वर्षात आपली बचत करोडोत पोहचली. नोकरी सोडल्यानंतर डॅनिअलने काही मित्रांसोबत स्टार्टअप सुरु केला.
IIT-Bombay techie worked with JP Morgan, Google, and now has enough money to retire at 29
IIT-Bombay techie to retire at 29
IIT-Bombay alumnus Daniel George
IIT-Bombay alumnus Daniel George
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements