Sushmita Sen on Wedding Plans
1994 मिस यूनिवर्स अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या बेधडक आणि मोकळ्या स्वभावासाठी ओळखली जाते. ‘फिल्म कम्पॅनियन’ला दिलेल्या मुलाखतीत सुष्मिता तिच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली (Sushmita Sen on Wedding Plans). सुष्मिता गेल्या काही काळापासून रोहमन शॉलला डेट करतेय. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत्या. मात्र पुन्हा हे दोघं एकत्र आले. त्यामुळे वयाच्या 48 व्या वर्षी सुष्मिता रोहमनशी लग्न करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्यावर तिने या मुलाखतीत उत्तर दिलं आहे.
लग्न करण्याचा कोणताच प्लॅन नसल्याचं तिने स्पष्ट केलंय. “मला माहितीये की अख्ख्या जगाला असं वाटतंय की किमान या वयात तरी मी लग्नाचा गांभीर्याने विचार करावा. मात्र मला त्याने काहीच फरक पडत नाही”, असं सुष्मिता म्हणाली. “लग्न करण्याला मी फारसं महत्त्व देत नाही हे बोलताना मी असंही स्पष्ट करू इच्छिते की लग्नसंस्थेवर मला प्रेम आणि आदर आहे. मी माझ्या आयुष्यात खूप चांगली जोडपी पाहिली आहेत. माझ्यासमोरच ‘आर्या’ या वेब सीरिजचे दिग्दर्शक राम माधवानी आणि निर्माती अमिता माधवानी यांचं उत्तम उदाहरण आहे. मला माहित असलेल्या जोडप्यांपैकी ते सर्वांत सुंदर आणि चांगले आहेत. पण मला मैत्री या संकल्पनेवर अधिक विश्वास आहे आणि जर का ती मैत्री असेल तर गोष्टी घडतील. पण नात्यात तो आदर आणि ती मैत्री माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. त्यासोबतच स्वातंत्र्यही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी स्वातंत्र्याला आणि माझ्या कामाला अधिक महत्त्व देते”, अशा शब्दांत सुष्मिता व्यक्त झाली.
सुष्मिता आणि रोहमन एकमेकांना डेट करत असले तरी अद्याप दोघांनीही प्रेमाची जाहीर कबुली दिली नाही. 2018 मध्ये हो दोघं डेट करू लागले आणि त्यानंतर 2021 मध्ये इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्यांनी ब्रेकअपचा खुलासा केला. ब्रेकअपनंतरही दोघं विविध पार्ट्यांमध्ये, डिनर डेटला एकत्र दिसले. ‘आमची सुरुवात मैत्रीने झाली, आम्ही कायम एकमेकांचे मित्र राहू. नातं कधीच संपलं होतं.. पण त्यातील प्रेम नेहमीच टिकून राहील’, असं लिहित सुष्मिताने ब्रेकअपची माहिती दिली होती.
गेल्या वर्षी दिवाळीत सुष्मिता आणि रोहमन हे निर्माते विशाल गुरनानी आणि जुही पारेख मेहता यांच्या पार्टीत एकत्र दिसले होते. गेल्या महिन्यात मुंबईत या दोघांना एकत्र पाहिलं गेलं होतं. सुष्मिताने एकल मातृत्व स्वीकारलं असून अलिसाह आणि रिनी या तिच्या दोन मुली आहेत. 2000 मध्ये तिने रिनीला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर 2010 मध्ये तिने अलिसाहला दत्तक घेतलं.
Sushmita Sen on Wedding Plans
Sushmita Sen on Wedding Plans
Sushmita Sen on Wedding Plans
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements