IND-PAK एकाच गटात, पण होणार नाही सामना?
ICC Under-19 World Cup Super Six Schedule : आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने विजयाची हॅट्ट्रिक नोंदवत सुपर सिक्समध्ये स्थान पक्के केले आहे. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या अंडर-19 वर्ल्ड कपच्या Super Six फेरीचे वेळापत्रकही निश्चित झाले आहे (ICC U-19 World Cup 2024 Super Six Stage).
सुपर सिक्स फेरीत भारत आणि पाकिस्तान एकाच गट-1 मध्ये आहेत. मात्र, या फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार नाही. 30 जानेवारीपासून सुपर सिक्स फेरीचे सामने खेळल्या जाणार आहेत. टीम इंडियाला आपले दोन सामने न्यूझीलंड आणि नेपाळसोबत खेळायचे आहेत. यानंतर बाद फेरीचे सामने खेळवले जातील.
ICC U-19 World Cup 2024 Super Six Stage
पहिल्या टप्प्यातील अ गटातील 3 आणि ड गटामधील 3 संघ सुपर सिक्स टप्प्यात एकाच गटात असणार आहे, त्याचबरोबर गट ब आणि क गटात पण असेच असणार आहे. भारताच्या गट 1 मध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश, आयर्लंड आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. सुपर सिक्स फेरीच्या गट 2 मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे भारत-पाकिस्तान एकाच गटात आहेत, पण त्यांच्या सामना होणार नाही, कारण ते पहिल्या फेरीनंतर आपापल्या गटात अव्वल क्रमांकावर आहेत.
भारत (अ गटातील अव्वल संघ) 30 जानेवारीला न्यूझीलंड (ड गटातील दुसरे स्थान) आणि 30 जानेवारीला नेपाळ (ड गटातील तिसरे स्थान) यांच्याशी भिडणार आहे. ड गटातील अव्वल संघ पाकिस्तान हा बांगलादेश (अ गटातील दुसरे स्थान) आणि आयर्लंडशी (अ गटातील तिसरे स्थान) आपले सामने खेळणार आहे. दोन सुपर सिक्स गटांतील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन उपांत्य फेरीचे सामने 6 आणि 8 फेब्रुवारीला होणार आहेत. फायनल 11 फेब्रुवारी रोजी बेनोनी येथे होणार आहे.
ICC U-19 World Cup 2024 Super Six Stage
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements