History of Onion
कांदा (Onion) हा आपल्या जेवणातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कांद्याच्या दरांमधील चढउतार आपल्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकत असते. कांदा हा पाच हजार वर्षांपासून वापरात असल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच कांद्याची उत्पत्ती जुनी आहे. कांदा सगळ्यात आधी कुठे निर्माण झाला. त्यानंतर तो जगभरात कसा पसरला याचा इतिहास रंजक आहे (History of Onion – Origin and Historical Use).
कांद्याचे उत्पादन जगभरातील देशांमध्ये घेतले जाते. भारत आणि चीनमध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. असे असले तरी कांदा सर्वाधिक खाणाऱ्या देशांमध्ये भारत-चीनचा समावेश होत नाही. मोदी सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली आहे. त्यामुळे कांदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
History of Onion
कांदा हा मध्य आशियामधून आला असं तज्ज्ञ सांगतात. सर्वात आधी कांदा इराण आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये घेतला गेला असं काही रिपोर्ट सांगतात. जंगली कांद्याचा सुरुवातीला शोध लागला. त्यानंतर हळूहळू त्याचा खाण्यात वापर वाढला. कांद्याची रितसर शेती सुरु झाली. काही तज्ज्ञांचा दावा आहे की कांदा पाच हजार वर्षांपेक्षा जुना आहे. सुरुवातीच्या काळात विविध जंगलामध्ये हे उगवत होते.
अन्नाला चव देण्यामध्ये कांदा महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळेच कांद्याची निर्यात-आयात मोठ्या प्रमाणात होत असते. चरक संहितेमध्ये कांद्याचे विविध फायदे सांगण्यात आले आहेत. काही आजारांमध्ये औषध म्हणून देखील कांद्याचा वापर होतो. कांद्याला खूप काळ साठवून ठेवलं तरी तो खराब होत नाही हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ठ्य आहे.
इजिप्तमध्ये कांद्याला खूप महत्व आहे. याला देवाच्या प्रार्थनेचे प्रतीक मानलं जातं. इजिप्तच्या लोकांची धारणा आहे की कांदा आणि माणसाचे आयुष्य यांमध्ये साधर्म्य आहे. ज्या प्रमाणे कांद्याचा एक-एक स्तर निघतो, तसंच माणसाचं जीवन आहे. त्यामुळे इजिप्तमध्ये माणूस मेल्यानंतर त्याला पुरताना त्याच्यासोबत कांदा ठेवला जातो. जुन्या काळापासून असं होत आलं आहे. कांद्याला अंत्यसंस्कारात देण्यात येणाऱ्या भेटीच्या स्वरुपात पाहिलं जातं.
संयुक्त राष्ट्राच्या माहितीनुसार, 175 देशांमध्ये कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गहुचे उत्पादन घेणाऱ्या देशांपेक्षा कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या देशांची संख्या दुप्पट आहे. कांद्याला वैश्विक पदार्थ देखील म्हटलं जातं. भारत, चीन, अमेरिका, इजिप्त, तुर्की आणि पाकिस्तानमध्ये सर्वाधिक कांद्याचे उत्पादन होते. तजाकिस्तानमध्ये सर्वाधित कांद्याचा वापर होतो. प्रति व्यक्ती 60 किलो कांदा वापर या देशात होतो. त्यानंतर नायजेरिया आणि सूडान या देशांचा क्रमांक लागतो.
भारतात महाराष्ट्रात कांद्याची शेती सर्वात जास्त होते. येथे वर्षातून दोन वेळा कांद्याचे पीक घेतले जाते : एक नोव्हेंबर आणि दूसरे मे महिन्याच्या जवळ पास. लाल कांद्याची साठवण क्षमता फार कमी आहे. तर पांढरा कांदा आपण बराच काळ मोठ्या प्रमाणात साठवून ठेवू शकतो.
Onions have a rich history dating back thousands of years. They are believed to have originated in central Asia, in the region of modern-day Iran and Pakistan. Ancient civilizations such as the Egyptians, Greeks, and Romans valued onions for their culinary and medicinal properties.
Onions were not only used as a staple food but also revered for their medicinal properties. They were believed to have healing powers and were used to treat various ailments, including colds, wounds, and even as a diuretic.
Throughout history, onions have been traded and cultivated widely, spreading to different parts of the world through trade routes and exploration. They were introduced to the Americas by European settlers and quickly became a popular ingredient in various cuisines.
Today, onions are one of the most widely cultivated and consumed vegetables globally, used in a wide range of dishes and cuisines. They are valued for their flavor-enhancing properties as well as their nutritional benefits, being rich in vitamins, minerals, and antioxidants. Onions remain an integral part of culinary traditions around the world, continuing their legacy from ancient times to the present day.
History of Onion
History of Onion
History of Onion
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements