रवींद्र व रिवाबा यांच्याशी आपला कोणताच संबंध नाही
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja ) यांच्या घरातील कलह चव्हाट्यावर आला आहे. रवींद्रचे वडील अनिरुद्धसिंग जडेजा (Anirudhsinh Jadeja) यांनी भारतीय क्रिकेटपटू आणि त्याची आमदार पत्नी रिवाबा (Rivaba Jadeja) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रवींद्र व रिवाबा यांच्याशी आपला कोणताच संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर जडेजाने ट्विट करून त्याची बाजू मांडली आहे.
दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत अनिरुद्धसिंग म्हटले की,’ रवींद्र जडेजा आणि त्याची पत्नी रिबावा जडेजा यांच्याशी माझं काहीच नातं नाही. जडेजाच्या लग्नाच्या दोन-तीन महिन्यानंतर हा वाद सुरू झाला रिबावाने त्याच्यावर कोणती जादू केलीय हे माहित नाही. पण, माझ्या मुलासाठी माझं काळीज तुटतंय. त्याने लग्नच केलं नसतं तर बरं झालं असतं. त्याला मी क्रिकेटपटूचं बनवलं नसतं तर बरं झालं असतं. किमान असा दिवस पाहायला मिळाला नसता.
त्यावर जडेजाने ट्विट केले की, हल्लीच एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या निराधात मुलाखतीमधून सांगितलेल्या सर्व गोष्टी अर्थहीन आणि असत्य आहेत. त्या एकांगी आहेत. त्यांचं मी स्पष्टपणे खंडन करतो. माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन करण्यासाठी जे प्रयत्न करण्यात आले ते निंदनीय आणि अशोभनीय आहेत. माझ्याकडे पण सांगण्यासारखं खूप काही आहे. जे मी सार्वजनिकरीत्या सांगितलं नाही तरी त्यांना माहिती आहे.
Ravindra Jadeja lashes out at his father
Ravindra Jadeja lashes out at his father
Ravindra Jadeja lashes out at his father
Ravindra Jadeja lashes out at his father
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements