मुख्यमंत्र्यांना अटक करता येऊ शकते?
CM सोरेन यांना अटक होणार? DIG-IG सह मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी
कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहचले. जवळपास 40 तासानंतर अचानक सोरेन दिल्लीहून रांचीत परतले. आज झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. ईडीच्या चौकशीत अडकलेले मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चंपई सोरेन यांना झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले आहे. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्याची पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सोपवली जातील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे चंपई सोरेन यांच्याकडे सोपवली आहे (Hemant Soren resigns as Jharkhand CM).
माहितीनुसार, जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी सुरू असून अशा परिस्थितीत सोरेन 15 दिवस रांचीमध्ये ईडीच्या कोठडीत राहू शकतात असं बोललं जात आहे. सोरेन यांनी दिल्ली ते रांची असा 1250 किमीचा प्रवास केला. त्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि सहकारी आमदारांची सोरेन यांनी बैठक घेतली. बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत चंपई सोरेन यांना सभागृह नेता म्हणून निवडण्यात आले.
घटनेच्या कलम 361 नुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना अटकेपासून सूट देण्यात आली आहे. ही सूट दिवाणी आणि फौजदारी दोन्ही प्रकरणांमध्ये लागू आहे. म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना पदावर असताना अटक किंवा ताब्यात ठेवता येत नाही. कोणत्याही न्यायालयातही त्याच्या विरोधात कोणताही आदेश काढता येत नाही. मात्र, पद सोडल्यानंतर त्यांना अटक किंवा ताब्यात घेतले जाऊ शकते. त्याच वेळी, कायद्यानुसार पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य, विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य यांना नागरी प्रकरणांमध्ये अटक आणि ताब्यात घेण्यापासून सूट देण्यात आली आहे. पण गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सूट नाही.
Hemant Soren resigns as Jharkhand CM
मात्र, मुख्यमंत्री किंवा विधानसभेच्या कोणत्याही सदस्याला अटक किंवा ताब्यात घ्यायचे असल्यास सभागृह अध्यक्षांची मंजुरी घेणे आवश्यक आहे, याशिवाय अधिवेशनाच्या 40 दिवस आधी आणि 40 दिवसानंतर कोणत्याही सदस्याला अटक करता येणार नाही ना कुणालाही ताब्यात घेतले जाऊ शकत नाही.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements