Hardik Pandya returns to competitive cricket with DY Patil T20 Cup
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून कोणत्या ना कोणत्या कराणांसाठी चर्चेत असतो. आधी तो अचानक आयपीएल ट्रेडमधून गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये परतला. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यावर खुद्द मुंबई इंडियन्सनंचं पांड्या कर्णधार झाल्याची घोषणा केली. तेव्हा यावरूनही सोशल मीडियावर गदारोळ झाला होता. पण आता हार्दिक पांड्या पुन्हा एका नव्या वादात सापडला आहे. आणि त्याच्यावर बीसीसीआयचे नियम मोडल्याचा आरोप होत आहे (Hardik Pandya returns to competitive cricket with DY Patil T20 Cup).
खरंतर, हार्दिक पांड्याने गेल्या पाच महिन्यांपासून क्रिकेट खेळलेले नाही. तो 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधून बाहेर पडला, तेव्हापासून तो मैदानातून बाहेर होता. आता आयपीएल 2024 जवळ आल्याने त्याने स्वत:ला फिट केले आहे. दरम्यान, आयपीएलपूर्वी तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विशेष स्पर्धेत खेळण्यासाठी आला होता. रिलायन्स संघाकडून खेळताना हार्दिक जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा त्याच्याकडून मोठी चुक झाली.
हार्दिक पांड्या डीवाय पाटील स्पर्धेत (DY Patil T20 Cup 2024) फलंदाजीसाठी आला, तेव्हा त्याच्या हेल्मेटवर बीसीसीआयचा लोगो होता आणि खाली तिरंगा होता. पण बीसीसीआयच्या नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेत बीसीसीआयचा लोगो वापरता येत नाही. हा लोगो तेव्हाच वापरला जातो, जेव्हा खेळाडूला बीसीसीआयने निवडलेल्या संघात खेळण्याची संधी मिळते. खेळाडू कोणत्याही अंडर-19 देशांतर्गत स्पर्धा, रणजी, सय्यद मुश्ताक किंवा इतर कोठेही बीसीसीआयचा लोगो असलेले हेल्मेट वापरू शकत नाही. हे आम्ही म्हणत नसून बीसीसीआयचा नियम सांगत आहे. आता हार्दिकने हा नियम मोडला असून तो भविष्यात कोणत्या अडचणीत सापडतो, त्याच्यावर कारवाई होते की नाही, हे पाहणे बाकी आहे.
Hardik Pandya in DY Patil T20 Cup
Hardik Pandya in DY Patil T20 Cup
Hardik Pandya in DY Patil T20 Cup
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements