Buzz over Navjot Singh Sidhu’s return to BJP, Gurdaspur ticket for Yuvraj Singh
Punjab Lok Sabha Elections : पंजाबमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीच्याआधी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात भाजप क्रिकेटपटूंवर डाव लावण्याच्या तयारीत आहे. माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांना पुन्हा भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवाय युवराज सिंगला गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून उभे केले जाण्याची शक्यता आहे (Is Navjot Singh Sidhu also leaving Congress?).
Yuvraj Singh likely to contest from Gurdaspur on BJP ticket, to replace Sunny Deol in Lok Sabha polls 2024
नवज्योत सिंग सिद्धू काँग्रेस पक्ष नेतृत्त्वावर नाराज असल्याचं सांगितलं जातं. पक्ष सोडून ते आपल्या वेगळ्या सभा घेत आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना अधिक बळ मिळत आहे. सिद्धू हे आपल्या वक्तृत्वासाठी ओळखले जातात. अनेक टीव्ही कार्यक्रमामधून त्यांनी देशवासीयांवर छाप टाकली आहे. सिद्धू यांचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत चांगले संबंध आहेत. पण, पंजाबमधील भाजप नेत्यांना वाटतंय की ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यांच्या येण्याचा पक्षाला फायदा होईल. तसेच त्यांना पंजाबमधील एका मतदारसंघातून लोकसभेसाठी तिकीट दिले जाऊ शकते.
अमृतसर या लोकसभा मतदारसंघावर पूर्वीपासून भाजपचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे येथून सिद्धू यांना उभे केले जाऊ शकते. सिद्धू यांच्या अमृतसरमधून जिंकून येण्याच्या शक्यता जास्त आहेत. असे असले तरी काँग्रेस या शक्यतांना फेटाळून लावल्या आहेत. सिद्धू हे भाजपमध्ये जाणार नाहीत. एका पक्षामधून दुसऱ्या पक्षामध्ये उड्या मारणाऱ्यांची काहीच विश्वासार्हता राहत नाही, असं रमन बक्षी म्हणाले.
भाजप सिद्धू यांना अमृतसरमधून तर युवराज सिंगला गुरुदासपूर येथून उभे करण्यासाठी फिल्डिंग लावत आहे. गुरुदासपूरमधून एक सेलिब्रिटी देण्याची भाजपची परंपरा राहिली आहे. यापू्वी विनोद खन्ना, सनी देओल यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. विनोद खन्ना चारवेळा या मतदारसंघातून खासदार होते. सध्या या मतदारसंघाचे खासदार सनी देओल आहेत.
Gurdaspur ticket for Yuvraj Singh
Gurdaspur ticket for Yuvraj Singh
Gurdaspur ticket for Yuvraj Singh
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements