Glenn Maxwell hits 5th T20I hundred
AUS vs WI : Glenn Maxwell hits 5th T20I hundred, equals Rohit Sharma’s world record in Adelaide | ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात क्रिकेट चाहत्यांना वादळी खेळी पाहायला मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाला वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध नाबाद द्विशतक ठोकून विजय मिळवून देणाऱ्या ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याने पुन्हा एकदा धमाका केला आहे. मॅक्सवेल याने वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात खणखणीत शतक ठोकलं आहे. मॅक्सवेल याने या शतकासह मोठा कारनामा केला आहे.
मॅक्सवेल याने अवघ्या 50 बॉलमध्ये हे शतक ठोकलं. मॅक्सवेलच्या टी20 कारकीर्दीतील हे पाचवं शतक ठरलंय. मॅक्सवेलने यासह रोहित शर्माच्या सर्वाधिक टी20 शतकांची बरोबरी केली आहे. रोहितने काही महिन्यांआधी झालेल्या टी20 मालिकेत अफगाणिस्तान विरुद्ध पाचवं शतक ठोकलं होतं. विशेष बाब म्हणजे मॅक्सवेलने रोहितच्या तुलनेत 50 डावांआधी 5 शतकं पूर्ण केली आहेत. रोहितने 143 डावांमध्ये 5 शतकं केली आहेत. तर मॅक्सवेलने 94 व्या डावातच हा कारनामा केला.
दरम्यान मॅक्सवेल याने विंडिज विरुद्ध 55 बॉलमध्ये 12 चौकार आणि 8 सिक्ससह 218.18 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 120 धावांची खेळी केली. मॅक्सवेलच्या या तुफानी शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 241 धावा केल्या. त्यामुळे आता विंडिजसमोर 242 धावांचं आव्हान असणार आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलिया या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना हा 11 धावांनी जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल, तर हा दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे आता विंडिज 242 धावांचा पाठलाग कशाप्रकारे करते, याकडे लक्ष असणार आहे.
Glenn Maxwell hits 5th T20I hundred
Glenn Maxwell hits 5th T20I hundred
Glenn Maxwell hits 5th T20I hundred
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements