बेळगाव—belgavkar : बेळगाव शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 15 व्या अर्थसंकल्प दरम्यान विशेष अनुदानाची तरतूद केली आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी 4.5 किलो मीटरचा फ्लाय ओव्हर बांधकामासाठी 450 कोटी रुपये अनुदानाची विशेष तरतूद केली आहे.
यामुळे बेळगावकरांचे बहुप्रतीक्षेत असलेले स्वप्न पूर्ण होणार आहे. फ्लाय ओव्हर निर्माण ही बेळगाव जिल्हापालक मंत्री सतीश जारकीहोळी यांची महत्वाकांक्षी योजना असून सदर योजना लागू करण्यासाठी यापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या.
बेळगावात पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग ते सीबीटी व दुसऱ्या टप्प्यात अशोक सर्कल ते पिरनवाडीपर्यंत (व्हाया राणी चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, कॅम्प (खानापूर रोड)) उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला प्रवेश व निर्गमनाची सोय असणार आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. मंत्री जारकीहोळी व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी यासाठी पाहणीही केली आहे.
flyover in Belgaum city to reduce traffic congestion belgav belagavi belgavkar explore digital india
flyover in Belgaum city to reduce traffic congestion
flyover in Belgaum city to reduce traffic congestion
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements