बेळगाव मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांकडे मागितला हा पुरावा
महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात पुन्हा बेळगाव सूर आलापण्यात आला आहे. राज्याच्या स्थापनेपासूनच बेळगाव हा मराठी अस्मितेचा विषय राहिला आहे. बेळगाव भागातील मराठी भाषिकांवर कन्नडिंगाकडून करण्यात येणाऱ्या अत्याचाराविरोधात अनेकदा आंदोलने झाली. आता नेमका हाच धागा पकडून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री दावा करत आहे की मी बेळगावच्या जेल मध्ये होतो .बेळगाव तुरुंगात असेल तर अजूनही तसा पुरावा आला नाही. जर ते जेल मध्ये होते. लाठी काठी खाल्ली असेल, तर त्यांनी या प्रश्नावर तोंड उघडायला पाहिजे होते, अशी कोपरखळी राऊत यांनी मारली.
बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे…. तो ना कर्नाटकचा आहे ना महाराष्ट्राचा आहे अशी ती स्थिती आहे, असे संजय राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याची आग्रही भूमिका अनेकदा घेतली. आता शिवसेनेत असलेले आणि नसलेल्या अनेकांनी गनिमी कावा करत बेळगावमध्ये आंदोलन पेटते ठेवले. मराठी अस्मिता जागृत ठेवली. आता पक्ष फुटल्यानंतर बेळगाव प्रश्नावर एकमेकांवर निशाणा साधण्यात येत आहे.
Eknath Shinde in Belgaum Jail Sanjay Raut
Eknath Shinde in Belgaum Jail Sanjay Raut
Eknath Shinde in Belgaum Jail Sanjay Raut
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements