Earthquake hits Southwest Indian Ridge : दक्षिण पश्चिम भारतीय रिजवर भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.2 इतकी मोजली गेली आहे. आज पहाटे 3.39 वाजता हा भूकंप झाला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही माहिती दिली आहे.
काल (शनिवार) हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यासह शिमला आणि कुल्लूच्या वरच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3 इतकी नोंदवण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी हिमाचलमध्ये 3 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्यामध्ये चंबा हे केंद्र मानले जाते. डोंगराळ भाग असल्याने हिमाचलमध्ये भूकंपामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते (earthquake measuring 6.2 on the Richter scale struck the Southwest Indian Ridge at 3:39 am, as reported by the National Centre for Seismology.).
Earthquake hits Southwest Indian Ridge
तसेच नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, शनिवारी सकाळी अंदमान-निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील निकोबार बेटांजवळ होता. या भूकंपानंतर कोणतेही मोठे नुकसान किंवा हानी झाल्याचे वृत्त नाही. याआधीही 10 जानेवारीला याच परिसरात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप जाणवला होता. या भूकंपाने लोकांनाही धक्का बसला आहे, मात्र मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements