कर्नाटक : एका सरकारी निवासी शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता नववीची विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिला आहे. कर्नाटकातील चिक्कबळ्ळापुर येथील रुग्णालयात या मुलीची प्रसूती झाली. धक्कादायक म्हणजे तिची प्रसूती होईपर्यंत ती गरोदर होती हेच माहिती नव्हतं. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि POCSO अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
14 वर्षीय मुलगी कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील सरकारी निवासी शाळेच्या वसतिगृहात राहते. तिची पोटदुखी वाढल्यानंतर ती बागेपल्ली तालुक्यातील तिच्या घरी गेली. तिच्या पोटात दुखू लागल्याने पालकांनी तिला रुग्णालयात नेलं. तिथं तपासणी केली असता ती गरोदर असल्याचं स्पष्ट झालं. गरोदर असल्याचं कळताच डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करून घेतलं. तिची आवश्यक वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर 9 जानेवारी रोजी तिची प्रसूती झाली. प्रसूतीदरम्यान मुलीचं वजन कमी होतं, परंतू तरीही बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं वरिष्ठ पोलिसांनी सांगितलं.
समूपदेशनात काय म्हणाली पीडिता? : ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर बाल कल्याण समितीने मुलीचे समुपदेशन केलं. या समुपदेदरम्यान तिच्यावर कोणी लैंगिक अत्याचार केले याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी ती म्हणाली, तिच्या वरच्या वर्गात असलेल्या मुलाने तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. त्यामुळे ती गरोदर राहिली. परंतु, या मुलाने हे आरोप फेटाळले. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी आयपीसीच्या कलम ३७६ (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांविरूद्ध मुलांचे संरक्षण कायद्याच्या इतर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तसंच, तुमकुरू जिल्हा प्रशासनाने वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित केले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Class 9 student of Karnataka govt residential school delivers baby; police register POCSO case
Class 9 student Karnataka school delivers baby
Class 9 student Karnataka school delivers baby
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements