Karnataka Board 5th 8th 9th Class Moulyankana Test Dates 2024
नववीसाठीही मूल्यांकन परीक्षा होणार;
Karnataka 9th Second Summative Assessment (SA-2) Exam
Karnataka Board 5th 8th 9th Class Moulyankana Test Dates 2024
Class 5 8 and 9 Assessment
Class 5 8 and 9 Assessment बेळगाव—belgavkar : कर्नाटक राज्य शिक्षण खात्याच्यावतीने सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित खासगी शाळांमधील पाचवी, आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन परीक्षा 11 मार्च ते 18 मार्च अखेर होणार असल्याची माहिती राज्य शालेय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिली आहे (Karnataka School Examination and Assessment Board (KSEAB)). शिक्षण खात्याने पाचवी, आठवी व नववीच्या मूल्यांकन परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 11 मार्चपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे.
काही दिवसांपूर्वी शिक्षण खात्याने मूल्यांकन परीक्षेचे तात्कालिक वेळापत्रक जाहीर केले होते. तसेच वेळापत्रकाबाबत आक्षेप मागविण्यात आले होते. त्यानंतर शिक्षण खात्याने शुक्रवारी पत्रक जाहीर करून अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पाचवीची मूल्यांकन परीक्षा 11 ते 14 मार्चपर्यंत होणार आहे. तर आठवी व नववीची परीक्षा 11 ते 18 मार्चपर्यंत होणार आहे. गेल्याकाही दिवसांपूर्वी शिक्षण खात्याने पत्रक जाहीर करून मूल्यांकन परीक्षा कशाप्रकारे घेण्यात यावी, याची माहिती उपलब्ध करून दिली होती. तसेच बोर्डाच्या परीक्षेप्रमाणे मूल्यांकन परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली आहे.
पाचवीचे वेळापत्रक
दिनांक :- विषय
11 मार्च :- प्रथम भाषा
12 मार्च :- व्दितीय भाषा
13 मार्च :- परिसर अध्ययन
14 मार्च :- गणित
आठवी व नववीचे वेळापत्रक
दिनांक :- विषय
11 मार्च :- प्रथम भाषा
12 मार्च :- व्दितीय भाषा
13 मार्च :- तृतीय भाषा
14 मार्च :- गणित
15 मार्च :- विज्ञान
16 मार्च :- समाज विज्ञान
18 मार्च :- शारिरिक शिक्षण
दरम्यान, मूल्यांकन परीक्षेला विरोध करत खासगी शिक्षण संस्थांच्या व्यवस्थापन मंडळ संघटनेने शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून परीक्षा घेऊ नये, अशी मागणी केली आहे. तसेच योग्य निर्णय झाला नाही तर न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.
गेल्यावर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी शिक्षण खात्याच्यावतीने परीक्षा घेण्यात आली होती. मात्र यावर्षी नववीसाठीही मूल्यांकन परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गेल्यावर्षीपासून शिक्षण खात्याच्यावतीने या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार केल्या जात आहेत. त्यानंतर परीक्षेपूर्वी संबंधित शैक्षणिक जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातून परीक्षा केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका पाठविण्यात येणार आहेत.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements