एका मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीच्या भारतीय सीईओंचा कंपनीच्या Ramoji Film City (Hyderabad) येथील एका कार्यक्रमात हवेतील पिंजऱ्यातून एन्ट्री करताना स्टेजवर कोसळून मृत्यू झाला आहे. रामोजी फिल्म सिटीमध्ये गुरुवारी रात्री हा अपघात घडला आहे. विसटेक्स एशिया-पॅसिफिक प्रायव्हेट लिमिटेडच्या रौप्यमहोत्सवी उत्सवादरम्यान हा अपघात झाला (CEO of Vestex Asia, a global software company). 56 वर्षीय सीईओ संजय शाह यांचा हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंपनीचे चेअरमन विश्वनाथ राजू दतला हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
रामोजी फिल्म सिटी येथे व्हिस्टेक्सने आपल्या कर्मचार्यांसाठी खोल्या बुक केल्या होत्या आणि दोन दिवसीय रौप्यमहोत्सवी उत्सवाचे आयोजन केले होते. Lime Light Garden येथील कार्यक्रमावेळी स्टेजवर CEO शाह आणि Chairman दतला हे लोखंडी पिजऱ्यातून एअर शो सारखे खाली उतरत होते. यावेळी १५ ते २० फुटांवर असताना पिंजऱ्याची एक तार तुटली आणि पिंजरा खाली कोसळला. यामध्ये दोघांनाही जबर मार लागला होता.
दोघांनाही जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु सीईओ संजय शाह यांचा मृत्यू झाला. हैदराबाद पोलिसांनी देखील या घटनेची पुष्टी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, कंपनीच्या अन्य अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून फिल्मसिटी कार्यक्रम व्यवस्थापन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Video पाहा : झाडावर मृत्यूनं घेरलं; झाडावर आला झटका).
Indian CEO of US-based firm falls to death at Ramoji Film City in Hyderabad
CEO death Ramoji Film City in Hyderabad
CEO death Ramoji Film City in Hyderabad
CEO death Ramoji Film City in Hyderabad
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements