हृदयद्रावक मृत्यू कॅमेऱ्यात कैद Viral Video
हल्ली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण सुरूच आहे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात लोकांना अचानक हृदयविकाराच्या झटका आला आणि जीव गेला. तेलंगणाच्या भुवनगिरी येथे अशीच एक दुःखद घटना घडली आहे. याठिकाणी ताडाच्या झाडावर चढलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला. या घटनेतून कधी काय होईल याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तामिळनाडूमधील एका गावात ताडीच्या झाडावर चढलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. नीरा काढण्यासाठी एक व्यक्ती नारळाच्या झाडावर चढला होता. झाडावर असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच लटकला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अधांतरी लटकलेल्या व्यक्तीला खाली उतरवले. हा व्यक्ती नेहमीप्रमाणे ताडाच्या झाडावर चढला होता.. यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. लक्ष्मय्या असे मृत व्यक्तीचे नाव असून ते राजन्नागुडेम गावचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती निरा मिळविण्यासाठी ताडाच्या झाडावर चढला होता. मात्र तो झाडावर असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.
కల్లు గీస్తుండగా గుండెపోటు
తాటి చెట్టుపైనే గీత కార్మికుడి మృతి
భువనగిరి – మోత్కూరు మండలం రాజన్నగూడెం గ్రామానికి చెందిన గీత కార్మికుడు లక్ష్మయ్య తాటి చెట్టు ఎక్కి కల్లు గీస్తుండగా గుండెపోటుతో చెట్టుపైనే మృతి చెందాడు. pic.twitter.com/3gcTEWyWSn
— Telugu Scribe (@TeluguScribe) January 17, 2024
यावेळी घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना ताडाच्या झाडावर लक्ष्मय्या मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर मृतदेह खाली आणण्यासाठी क्रेन आणण्यात आली. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती क्रेनच्या हुकला बांधून मृतदेह झाडावरून खाली काढताना दिसत आहे. हृदयविकाराचा झटका कशामुळे आला हे अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि ते मोठ्या प्रमाणावर शेअरही करत आहेत. एका युजरने पुढे लिहिले की, सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी जिवंत घरी परत येईल असा दावा कोणीही करू शकत नाही. हृदयविकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे.
man dies heart attack on palm tree in Telangana
man dies heart attack on palm tree in Telangana
man dies heart attack on palm tree in Telangana
Discover more from belgavkar
Subscribe to get the latest posts sent to your email.
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements