कर्नाटक—belgavkar : बंगळूर येथील सीसीबी पोलिसांनी अमली पदार्थ विक्री आणि सेवनाविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. पोलिसांनी 4 आंतरराष्ट्रीय तस्करांसह 7 तस्करांना अटक केली. पोलिसांनी ₹ 1 कोटी 52 लाख 50 हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. दरम्यान, दुसऱ्या एका कारवाईत Central Crime Branch पोलिसांनी ₹ 3 कोटी रुपये किमतीचे ई-सिगारेट जप्त केले आहेत (CCB seizes e-cigarettes worth Rs 3 crore).
अटक करण्यात आलेल्या तस्करांकडून 92.19 ग्रॅम वजनाच्या 219 एक्स्टसी गोळ्या, 505 ग्रॅमएमडीएमए क्रिस्टल, 130 ग्रॅम चरस, 100.88 ग्रॅम कोकेन, सहा दुचाकी, मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती शहर पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. पथकाने बंगळूर शहरातील ज्ञानभारती, बनासवाडी, हुलीमावू आणि पुलिकेशीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन भारतीय आणि चार विदेशी तस्करांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत, असे त्यांनी सांगितले.
₹ 3 कोटीचे ई-सिगारेट जप्त CCB seizes e-cigarettes worth Rs 3 crore
दुबईतून प्रतिबंधित इलेक्ट्रॉनिक सिगारेटची तस्करी करून विक्री करणाऱ्या केरळमधील एका व्यक्तीला सीसीबी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ₹ 3 कोटी रुपयांच्या ई-सिगारेट जप्त केल्या. शहरातील सुद्दागुंटेपाळ्य पोलिस ठाण्याच्या हद्दीतील न्यू गुरप्पानापाळ्य, पहिला टप्पा, बीटीएम लेआउट येथील एका घरात केंद्र सरकारने बंदी घातलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स (ई-सिगारेट्स) बेकायदेशीररीत्या आयात करुन साठवून त्याची विक्री तो करत होता. सीसीबी पथकाने त्याच्या घरावर छापा टाकून त्याला अटक केली. घरातून तीन कोटी रुपयांच्या ई-सिगारेट जप्त केले. दुबईहून इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ई-सिगारेट) कुरिअर एजन्सीद्वारे शहरात आणून त्यांची विक्री करून बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचे तपासात उघड झाले आहे (Mohammad Shuhaib from Kerala, illegally stored the banned e-cigarettes at his apartment in Gurappanapalya under the SG Palya police station limits. CCB seizes e-cigarettes worth Rs 3 crore).
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements