बेळगावचा नवा मास्टरप्लॅन
BUDA Belgaum : Belgaum Urban Development Authority
बेळगाव तालुक्यातील 28 गावं लवकरचं BUDA मध्ये
BUDA Belgaum बेळगाव—belgavkar : बेळगाव नगरविकास प्राधिकरण (बुडा – Belgaum Urban Development Authority – BUDA) कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या बेळगाव तालुक्यातील 28 गावांचा नियोजित मास्टर प्लॅनमध्येही समावेश केला जाणार आहे. या 28 गावांचा मास्टर प्लॅनमध्ये समावेश करताना त्याबाबत संबंधित गावातील नागरिकांची मतेही जाणून घेतली जाणार आहे. त्यासाठी बुडाने अधिसूचना जारी केली आहे (BUDA Belgaum).
कार्यक्षेत्रातील 28 गावांतील रहिवासी किंवा नागरिकांना 60 दिवसांत आपली मते किंवा सूचना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. मास्टरप्लॅन तयार करताना ती मते किंवा सूचना यांची दखल बुडाकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे या गावांमधून जास्तीत जास्त नागरिकांनी आपली मते व सूचना करणे आवश्यक आहे. मुळात बुडा कार्यक्षेत्रात समावेश करण्याच्या निर्णयाला या गावांमधील रहिवाशांनी विरोध केला आहेच. त्यामुळे बुडाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच आहे. ही गावे बुडा कार्यक्षेत्रातून वगळली जावीत, अशीच मागणी नागरिकांकडून होण्याची शक्यता आहे. पण नियमानुसार या गावांचा मास्टर प्लॅनमध्ये समावेश करताना तेथील नागरिकांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार बुडाकडून ही औपचारिकता पूर्ण केली जाणार आहे.
मते व सूचना दाखल करण्यास तब्बल दोन महिन्यांचा कालावधी आहे. बुडा कार्यालयात जाऊन किंवा पोस्टाच्या माध्यमातून मते व सूचना मांडता येणार आहेत. बुडा कार्यक्षेत्रात बेळगाव शहरासह 27 गावे आधीच समाविष्ट केलेली आहेत. पण तालुक्यातील आणखी 28 गावे समाविष्ट करण्याचा निर्णय 2020 मध्ये घेण्यात आला होता. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविला होता.
बुडा कार्यक्षेत्रात नव्याने समाविष्ट गावे : होनगा, कलखांब, मुचंडी, अष्टे, निलजी, मुतगा, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, बाळेकुंद्री बुद्रुक, होनीहाळ, मावीनकट्टी, बसरीकट्टी, मास्तमर्डी, शिंदोळी, कोंडस्कोप, धामणे, येळ्ळूर, अवचारहट्टी, यरमाळ, कुट्टलवाडी, नावगे, हंगरगा, कल्लेहोळ, सुळगे, गोजगे, मण्णूर, आंबेवाडी, जाफरवाडी, अलतगा व कडोली.
ऑगस्ट महिन्यात सरकारकडून हा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर 5 सप्टेंबर रोजी झालेल्या बुडा बैठकीत नव्या मास्टर प्लॅनमध्येही या 28 गावांचा समावेश करण्याचा निर्णयघेतला. नवा मास्टरप्लॅन तयार होईपर्यंत या 28 गावांतील शेतजमिनीला बिगरशेती दर्जा देण्यावर निर्बंधही घालण्यात आले. त्यामुळे या 28 गावांमधील रहिवासी नाराज झाले आहेत. बेळगावचा नवा मास्टरप्लॅन तयार करण्याच्या कामाचाठेका देण्यासाठी बुडाने निविदा काढली आहे. त्यात पाच कंपन्यांनी निविदा दाखल केल्या. त्या निविदांची तांत्रिक पडताळणी सुरू आहे. मास्टर प्लॅनचे काम करण्यासाठी लवकरच ठेकेदार निश्चित केला जाणार आहे. पण BUDA Belgaum belgavkar belgaum @ Belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements