PM Awas Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शुक्रवारी सोलापुरात 15 हजार घरांचे लोकार्पण करण्यात आले. पण या योजनेतून घर मिळवण्यासाठी लाच द्यावी लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात असून एका महिलेने घरासाठी ₹ 30000 घेतल्याचे भाजप खासदारांसमोर सांगितल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बदायू येथे विकसित भारत संकल्प यात्रे (Vikasit Bharat Sankalp Yatra) दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. त्यामध्ये भाजपचे (BJP) खासदार धर्मेंद कश्यप (Dharmendra Kashyap) आणि एक महिलेतील संवाद आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या या महिलेला कश्यप यांच्या हस्ते घराची चावी देण्यात आली.
चावी देत असताना कश्यप यांनी संबंधित ज्येष्ठ महिलेला घरासाठी कुणी पैसे तर घेतले नाहीत ना? अशी विचारणा केली. त्यावर होय ₹ 30000 रुपये घेतले, असे उत्तर त्या महिलेने दिले. त्यानंतर खासदारांसह उपस्थितांना त्याचे हसू आले. पण परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खासदारांनी हे खूप गंभीर असल्याचे सांगत चौकशी करण्याचे आदेश दिले. बदायूचे जिल्हाधिकारी मनोजकुमार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले. तातडीने या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला जाईल, असे कुमार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या व्हिडीओवरून आता राजकारण तापलं आहे. समाजवादी पक्षाचे नेते धर्मेंद्र यादव यांनी केंद्र आणि उत्तर प्रदेशात भ्रष्टाचाराने टोक गाठल्याची टीका केली.
30000 रिश्वत ली गई
भ्रष्टाचार मुक्त पार्टी द्वारा 👇 pic.twitter.com/VoUigIj2KP
— Atul Londhe Patil (@atullondhe) January 19, 2024
यादव म्हणाले, भाजपचे नेते म्हणत होते की, खाऊ देणार नाही आणि खाणारही नाही. पण संपूर्ण यंत्रणेतील लोक खात आहेत आणि भाजपच्या नेत्यांनाही देत आहेत. महिला माईकवर पैसे घेतल्याचे सांगत असेल तर त्याची चौकशी कसली करताय. संबंधितांवर तातडीने कारवाई करायला हवी. प्रत्येक लाभार्थ्यासोबत असेच होत असल्याचा दावाही यादव यांनी केला आहे.
BJP MP Dharmendra Kashyap Woman Claims Paying ₹30000 Bribe For PM Awas Yojana
BJP MP Dharmendra Kashyap PM Awas Yojana
BJP MP Dharmendra Kashyap PM Awas Yojana
BJP MP Dharmendra Kashyap PM Awas Yojana
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements