बिग बॉस फेम मॉडेल
राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बिग बॉसच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेली मॉडेल आणि अभिनेत्रीवर मित्राने बलात्कार केला आहे. अभिनेत्रीने मित्राविरोधात पोलिसांत FIR दाखल केली आहे (TV actress and former Bigg Boss 11 contestant). पीडित अभिनेत्रीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अभिनेत्रीला लग्नाचं आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले आहेत. पीडित अभिनेत्रीने तिगडी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 2022 पासून पीडिता आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते (Bigg Boss Contestant Files FIR Alleging Rape in Delhi).
2023 मध्ये पीडिता दिल्लीत आल्यानंतर आरोपी म्हणाला, ‘माझ्या एका मित्राला तुला भेटायचं आहे… तो भेटण्यासाठी हट्ट करु लागला…’ अभिनेत्री बिग बॉस फेम मॉडेल असल्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे. पीडित अभिनेत्रीला जेव्हा आरोपी भेटण्यासाठी आला, तेव्हा त्याने प्रचंड सामान आणलं होतं. त्यामध्ये अनेक प्रकारचे पदार्थ आणि पेय देखील होते. स्नॅक्स खाल्ल्यानंतर पीडित अभिनेत्रीची शुद्ध हरपली. पीडित अभिनेत्रीने अनेकदा नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
पीडित अभिनेत्री म्हणाली, आरोपी कायम लग्न करू असं म्हणायचा… एवढंच नाही तर, सतत लग्नाचं आमिष देत आरोपीने अभिनेत्रीचे न्यूड व्हिडीओ देखील शूट केले. पुढे जेव्हा पीडित अभिनेत्री आरोपीकडे लग्न करण्याची मागणी करायची तेव्हा तो अभिनेत्रीला न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. एवढंच नाही तर, पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत पीडित अभिनेत्रीने अनेकदा अबॉर्शन केल्याचं देखील कबूल केलं आहे. आरोपी अभिनेत्रीला सतत मारहाण देखील करायचा आणि पैसै घ्यायचा… अभिनेत्रीची तक्रार दाखल करत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दिल्ली पोलिसांनी आरोपी तरुणाचा तपास सुरू केला आहे. पीडितेचे जबाब नोंदवल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याआधारे कारवाई सुरू करण्यात आली आहे. सागंयाचं झालं तर, बिग बॉस लोकप्रिय शो आहे. नुकताच ‘बिग बॉस 17’ शोचा फिनाले पार पडला. अभिनेता सलमान खान याने मुनव्वर फारुकी याच्या नावाची घोषणा विजेता म्हणून केली. तर अभिनेता अभिषेक कुमार फर्स्ट रनरअप ठरला. सध्या सर्वत्र बिग बॉस शो आणि शोमधील स्पर्धकांची चर्चा रंगली आहे.
Bigg Boss Contestant Files FIR Alleging Rape in Delhi
Bigg Boss Contestant Files FIR Alleging Rape in Delhi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements