‘Rich Dad Poor Dad’ या पुस्तकाचे लेखक आणि प्रसिद्ध उद्योगपती
Best-Selling Author Robert Kiyosaki : कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात, रस्त्याकडेला असलेल्या पुस्तकांच्या स्टॉलवर एक पुस्तक आपल्याला हमखास पाहायला मिळतं, ते म्हणजे ‘रिच डॅड, पुअर डॅड’. श्रीमंत कसं व्हायचं? किंवा अधिक पैसे कसे कमवायचे? कुठे गुंतवणूक करायची? यासंबंधीचे सल्ले देणारं ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक जगभरातल्या बेस्ट सेलिंग (सर्वाधिक विकलं गेलेलं) पुस्तकांपैकी एक आहे. परंतु, जगाला श्रीमंत कसं व्हायचं याबाबत सल्ले देणारं पुस्तक लिहिणारा लेखक मात्र प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली आहे (@Best-Selling Author Robert Kiyosaki).
‘रिच डॅड, पुअर डॅड’चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्यावर सध्या 1.2 अब्ज डॉलर्सचं (9982 कोटी रुपये) कर्ज आहे. परंतु, त्यांना या कर्जाची चिंता नाही. उलट Author Robert Kiyosaki लोकांना कर्ज घेण्याचा सल्ला देत आहेत. प्रसिद्ध लेखक आणि उद्योगपती रॉबर्ट कियोसाकी यांचं एक इन्स्टाग्राम रील व्हायरल होत आहे. यामध्ये ते म्हणत आहे की, माझं कर्ज 1 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेलंय. परंतु, मी दिवाळखोर झालो तर बँकही दिवाळखोर होईल. त्यामुळे मला फार काही अडचण नाही. त्याचबरोबर मला या कर्जाची चिंतादेखील नाही.
Author Robert Kiyosaki म्हणाले, बहुसंख्य लोक कर्ज घेऊन त्यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढवतात. मुळात त्यांनी कर्ज घेऊन संपत्ती वाढवलेली असते. मला नेहमी वाटतं की, फेरारी आणि रोल्स रॉयससाख्या आलिशान गाड्या म्हणजे तुमची संपत्ती नव्हे. यांना जबाबदाऱ्या मानायला हवं. रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलं की ते रोख पैसे साठवून ठेवत नाहीत. ते म्हणाले, मी सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक करतो. मी कर्जाला अजिबात घाबरत नाही. कारण कर्ज म्हणजेच पैसे. चांगल्या कर्जातून पैसे निर्माण करता येतात आणि चुकीच्या कर्जातून कमी कामाई होते. मला वाटतं, लोकांनी कर्ज घ्यावीत आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करावी. माझ्याकडे सध्या 100 मिलियन डॉलर्सची संपत्ती आहे. सुरुवातीच्या काळात मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मीसुद्धा दिवाळखोरी पाहिली आहे. परंतु, हळूहळू मी त्या समस्येतून बाहेर पडलो आणि यशस्वी झालो.
पुस्तकाच्या 4 कोटींहून अधिक प्रतींची विक्री
‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक 1997 मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. हे पुस्तक आजही मोठ्या प्रमाणात विकलं जात आहे. 100 हून अधिक देशांमध्ये 50 हून अधिक भाषांमध्ये हे पुस्तक विकलं जात आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या 4 कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. लोक पैसे कमावण्यासाठी रॉबर्ट कियोसाकी यांनी दिलेले सल्ले वाचतात.
Best-Selling Author Robert Kiyosaki
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements