बेळगाव—belgavkar : सीमाप्रश्नाच्या लढ्यामध्ये अनेक हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या हुतात्म्यांना 17 जानेवारी रोजी अभिवादन करण्यात येणार आहे. हुतात्मा दिन सीमाभागात गांभीर्याने पाळून मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने अभिवादन करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन म. ए. युवा समितीच्यावतीने करण्यात आले. युवा समितीची महत्त्वाची बैठक रविवारी टिळकवाडी येथील कार्यालयात पार पडली. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
महाराष्ट्र शासनातर्फे सीमाभागातील नागरिकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीद्वारे आरोग्य सुविधा पुरविली जात आहे. परंतु, कन्नड संघटनांच्या दबावाखाली येत प्रशासनाने विरोध सुरू केला आहे. तसेच कोणतीही पडताळणी न करता सेवा केंद्र बंद केली जात आहेत. हे निषेधार्ह असून वैद्यकीय सेवा रोखणे म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. मनपातर्फे कन्नड सक्ती राबविण्यात येत असून व्यापारी परवाने रद्द करण्यासाठी कायदेशीर नोटीस दिली जात आहे. यामुळे सीमावासियांमधून संताप व्यक्त होत असून हे त्वरित थांबविण्याची मागणी करण्यात आली. बैठकीला सचिन केळवेकर, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, वासू सामजी, श्रीकांत कदम, सूरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Yuva Mes Meeting Hutatma Din belgav belagavi belgavkar
Belgaum Yuva Mes Meeting Hutatma Din
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements