बेळगाव—belgavkar : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांपाठोपाठ लक्ष विचलित करून एकाकी लोकांना लुटण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. पोलीस असल्याची बतावणी करून मॉर्निंग वॉकला गेलेल्या चंदगड (जि. कोल्हापूर) येथील एका वृद्ध शिक्षकाच्या अंगावरील 4 तोळ्यांचे सोन्याचे दागिने भामट्यांनी पळविले आहेत. शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी जुने बेळगाव परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे.
शुक्रवारी सकाळी 9 वाजता मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका वृद्ध शिक्षकाचे लक्ष विचलित करून त्यांच्या अंगावरील चेन, अंगठ्या असे चार तोळ्यांचे दागिने भामट्यांनी लांबविले आहेत. मूळचे चंदगड येथील मधुकर साळुंखे (वय 71) हे जुने बेळगावला आपल्या पाहुण्यांकडे आले होते. शुक्रवारी सकाळी बी. एस. येडियुराप्पा मार्गावर ते मॉर्निंग वॉकला गेले असता एका भामट्याने त्यांना गाठले. पुढे चोरी झाली आहे, आपण पोलीस आहोत, तुमचे दागिने सांभाळा, असा सल्ला देत त्यांच्या अंगावरील दागिने व मनगटी घड्याळ गोळा करून एका रुमालात बांधून त्यांच्या हातात ठेवले. थोड्या वेळानंतर त्या वृद्धाने रुमालाची गाठ सोडली असता सोन्याचे दागिने नसल्याचे आढळून आले. रुमालात केवळ घड्याळ होते.
एक भामटा वृद्धाशी बोलत होता तर दुसरा मोटारसायकलवर होता. त्याने आपल्याजवळील ₹ 50000 रुपये दाखवत आपणही सुरक्षित ठेवत असल्याचे सांगितले होते. यावरून वृद्धाच्या अंगावरील दागिने लुटणारे भामटे दोघे असल्याचे समजते. यासंबंधीची माहिती मिळताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. भामट्यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे का? याची पडताळणी करण्यात येत होती.
Belgaum Yediyurappa Road Teacher Robbed belgav belagavi belgavkar explore digital india
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
Belgaum Yediyurappa Road Teacher Robbed
Belgaum Yediyurappa Road Teacher Robbed
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310