बेळगाव—belgavkar : बेळगावात मराठी भाषिक बहुसंख्येने आहेत. त्यामुळे जाहिरात फलक किंवा होर्डिंग्जवर मराठीचा वापर ठळकपणे केला जातो. मराठी-कन्नड वाद टाळण्यासाठी अनेकांकडून केवळ इंग्रजी भाषेचा वापर केला जातो. पण, आता कन्नड संघटनांच्या दबावासह जिल्हा आणि पोलिस प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे बेळगाव शहरातील मराठी व इंग्रजी भाषेतील फलक व होर्डिंग्ज हटविण्यात येत आहेत. मराठी फलकांवर वक्रदृष्टी ठेवणाऱ्या जिल्हा प्रशासन व कन्नड दुराभिमान्यांना जशात तसे उत्तर देण्यासाठी मराठी फलक असतील त्या ठिकाणीच व्यवहार करावेत, असा ठराव झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते. बैठकीत प्रशासनाच्या कानडीकरणाच्या फतव्याचा निषेध करण्यात आला.
प्रशासन शहरातील दुकानदारांना टार्गेट करत आहे. काहीजण शहरात विविध ठिकाणी जाऊन दहशत माजवत आहेत. दुकानांचे फलक कन्नड भाषेत लावण्यासाठी दमदाटी करत आहेत. प्रशासनही कन्नड फलक न लावणाऱ्या दुकानदारांचा व्यापार परवाना रद्द करण्याचा इशारा देत आहे. मराठी भाषिकांवर होणारा हा अन्याय आहे. कर्नाटकने त्यांच्या प्रदेशात कन्नडबाबत कोणताही निर्णय घ्यावा; पण सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे. संसद, केंद्रीय गृहमंत्री व न्यायालयानेही हा प्रश्न अद्याप जिवंत असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत सीमाभागात कानडी सक्ती करण्यात येऊ नये, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
कन्नड नामफलकांच्या सक्तीविरोधात मंगळवारी (दि. 12 जानेवारी) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा प्रशासनाला मुदत देण्याचे आणि त्यानंतर विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासन कानडीकरणाची सक्ती करत आहे. पण, मराठी मतांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधीमूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे मराठी जनतेने आता तरी विचार करून त्यांना साथ देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले. ज्या दुकानात मराठी आहे, त्याच ठिकाणी व्यवहार करण्यात यावेत.
Belgaum Transactions where there will be Marathi boards Sign Boards Hoardings belgavkar belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements