बेळगाव—belgavkar : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. रामतीर्थनगर येथील एका बंद घराचा पाठीमागचा दरवाजा तोडून चोरट्यांनी सुमारे 10 लाखांचा ऐवज पळविला आहे. बुधवारी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून गुरुवारी यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
घरातील मंडळी नाताळच्या सुटीनिमित्त परगावी गेले असताना ही घटना घडली आहे. यासंबंधी रामतीर्थनगर येथील जोन्सकुमार कऱ्याप्पगोळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, पोलीस उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
Belgaum Thieves broke door house in Ramtirthanagar 10 lakhs Robbery belgavkar belgaum
@ Belgaum
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements