श्रीराम सेना हिंदूस्थानची याचिका हायकोर्टाने फेटाळली;
बेळगाव—belgavkar : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची सर्वांनाच उत्सुकता असून आज मंदिरात विधिवत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे (Ayodhya Ram Mandir Inauguration). या सोहळ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून अयोध्येमध्ये तयारी चालू आहे. काही दिवसांपासून श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे (Shriram Sena Hindusthan) धर्मवीर संभाजी चौकातून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेत तयारी केली होती.
त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना, पोलिस प्रशासन आणि उच्च न्यायालयाने श्रीराम सेना (हिंदुस्थान) तर्फे सोमवारी धर्मवीर संभाजी चौकातून निघणाऱ्या शोभायात्रेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. धर्मवीर संभाजी चौकातून मिरवणूक काढण्याचा निर्णय घेत तयारी केली होती. याबाबत प्रशासनाकडे परवानगीचा अर्ज दाखल केला. मात्र, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत परवानगी देता येणार नाही, अशी माहिती रामसेनेला दिली होती. त्यामुळे रामसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
बेळगाव : अयोध्या राम मंदिराचा फलक हटविला
शोभायात्रा काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. मात्र, इतर दिवशी शोभायात्रा काढण्यासाठी परवानगीचा अर्ज करावा, त्या दिवशी परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. शोभायात्रा काढण्यासाठी परवानगी नसल्याचे पत्र सरकारी वकिलांनी राज्य गृह विभागाच्या सचिवांसह बेळगाव पोलिस आयुक्त व उपायुक्तांना पाठविले आहे.
Belgaum Shriram Sena Hindusthan Ayodhya belgav belagavi belgavkar
belgavkar news
belgaum news
Ayodhya Ram Mandir Inauguration
Belgaum Shriram Sena Hindusthan Ayodhya
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements