बेळगाव—belgavkar : सीमाभागातील मराठी जनतेला मदत म्हणून 865 गावांसाठी वैद्यकीय तसेच अनेक योजनांचा लाभ महाराष्ट्र शासनाने दिला होता. पण त्याचा लाभ देताना कर्नाटक सरकार आडकाठी आणत आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य सरकारला याबाबत सूचना करून विविध योजनांचा लाभ मिळावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यात आले. मंगळवारी पवार निपाणी दौऱ्यावर आले असता त्यांना हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात, सीमावासीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकीसाठी राखीव जागा, महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ, मराठी शाळा, ग्रंथालयांना मदत केली जात आहे. पण सत्ता परिवर्तनानंतर सध्या या योजनांना कात्री लावण्याचे सध्याच्या कर्नाटक शासनाचे धोरण दिसत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना मराठी भाषिकांना महाराष्ट्र शासनाने देऊ केली आहे. त्याला खोडा घालण्याचा येथील अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. कानडीकरणाचा भाग म्हणून मराठी फलकांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू आहे. निपाणी पालिकेवरील वर्षानुवर्षे असणाऱ्या मराठी फलकावर सक्तीने कानडी फलक लावण्यात आला आहे. हे सर्व प्रकार पाहता सीमावासीय मराठी भाषिकांना त्रास देण्याचे षङ्यंत्र कर्नाटक शासन रचत आहे.
या सर्व प्रकरणात लक्ष घालून कर्नाटक शासनास समज देऊन आम्हा सीमावासियांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर शरद पवार यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याची ग्वाही दिली. यावेळी माजी महापौर व म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, बेळगाव तालुका चिटणीस एम. जी. पाटील, खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, सदस्य गोपाळराव पाटील, पांडुरंग सावंत, उमेश पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Sharad Pawar MES Kannada Board belgav belagavi belgavkar
Belgaum Sharad Pawar MES Kannada Board
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310