7 कंपन्यांनी ₹ 265 कोटी रुपयांच्या निविदा भरल्या
बेळगाव—belgavkar : बेळगाव विमानतळावरील प्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर बेळगाव विमानतळ असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद वाढता आहे. सध्या विमानतळावर 3600 चौरस मीटर क्षेत्रफळाचे टर्मिनल असून एकाचवेळी 300 प्रवासी प्रवास करतील, अशी बैठक व्यवस्था व इतर सुविधा उपलब्ध आहेत. परंतु, प्रवाशांची संख्या वाढत असल्याने भविष्यात मोठ्या टर्मिनलची आवश्यकता भासणार आहे. विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी परवानगी दिली असून एकाचवेळी 1200 प्रवासी प्रवास करतील, अशी व्यवस्था नव्या टर्मिनलमध्ये केली जाणार आहे.
सांबरा येथील बेळगाव विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. नव्या टर्मिनल बिल्डींगसह इतर सुविधा या नव्या विमानतळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यासाठी विमानतळ प्राधिकरणाने नोव्हेंबर महिन्यात निविदा मागविल्या होत्या. देशातील नामांकित अशा 7 कंपन्यांनी निविदा भरल्या असून यापैकी कोणत्या कंपनीला कंत्राट मिळते, हे पुढील दोन महिन्यांत स्पष्ट होणार आहे. एकाचवेळी दोन बोईंग विमाने विमानतळावर आल्यास प्रवाशांचा कोणताही गोंधळ होणार नाही, यासाठीची ही व्यवस्था करण्यात येणार आहे.
विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 265 कोटी 4 लाख रुपयांच्या निविदा विमानतळ प्राधिकरणाने नोव्हेंबर 2023 मध्ये मागवल्या होत्या. कंत्राटदार कंपनीला दोन वर्षांचा कालावधी दिला जाणार असून त्याकाळात टर्मिनल बिल्डींगसह इतर बांधकाम करावे लागणार आहे. एकूण 7 कंपन्यांनी निविदा भरल्या असून यापैकी एका कंपनीला विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम दिले जाणार आहे. यामध्ये बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, सीएस कन्स्ट्रक्शन लिमिटेड, गिरीधरीलाल कन्स्ट्रक्शन प्रा. लि., हर्ष कन्स्ट्रक्शन प्रा. लि., केएमव्ही प्रा. लि., केपीसी प्रा. लि., रेनाटस प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपन्यांनी बेळगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी उत्सुकता दर्शविली आहे.
Belgaum sambra airport development tender belgavkar Belgaum belgav belagavi belgaum
Belgaum sambra airport development tender
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements