बेळगाव—belgavkar : समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज बेळगावतर्फे समादेवी जन्मोत्सव मंगळवार (ता. 20 फेब्रुवारी) ते शुक्रवार (ता. 23) पर्यंत विविध कार्यक्रमांनी उत्साहात होणार आहे. मंगळवारी (ता. 20) सकाळी चौघडा व काकड आरती, कुंकूमार्चनाने उत्सवाला सुरुवात होईल. त्या दिवशी सकाळी 11 वाजता प्रमुख पाहुण्या स्वरुपा इनामदार यांच्या हस्ता देवी दरबारचे उद्घाटन होईल. त्यानंतर भजन, सत्संग, संध्याकाळी समाजातील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वेशभूषा, श्लोकपठण स्पर्धा, भाषण अशा विविध स्पर्धा होतील.
बुधवारी (ता. 21) सकाळी चौघडा व काकड आरती, लक्ष पुष्पार्चन, त्यानंतर सायंकाळी भजन व संध्याकाळी 7 वाजता माधव कुंटे यांचा राम गणेश गडकरी लिखित ‘ठकीचे लग्न’ हा धमाल विनोदी कथाकथन कार्यक्रम होईल. उत्सवाचा तिसऱ्या व प्रमुख दिवशी गुरुवारी (ता. 22) सकाळी चौघडा व काकड आरती, महाभिषेक, मिष्ठान व महानैवेद्य त्यानंतर ओटी भरण्यास प्रारंभ व त्यानंतर पुराण वाचन व ‘श्रीं’ची पालखी प्रदक्षिणा पाचवी प्रदक्षिणा समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली, नार्वेकर गल्ली, श्री समादेवी मंदिर येथे येऊन पालखी प्रदक्षिणा पूर्ण होईल. त्यानंतर रात्री आठा वाजता’श्रीं’च्या भांडारातील देवीला परिधान केलेल्या साड्या, खण व देवी समोरील श्रीफळे तसेच देवीकडील फळफळावळे लिलाव होईल.
पालखी प्रदक्षिणेनंतर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला चित्प्रकाशानंद सरस्वती स्वामीजी यांच्या उपस्थितीत विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ होईल. शुक्रवारी (ता. 23) सकाळी 6.30 ते 11 पर्यंत नवचंडीका होम संपन्न होणार आहे. दुपारी 12 ते 3 पर्यंत महाप्रसादाचे आयोजन आहे. या सर्व उत्सव कार्यक्रमांमध्ये समाजातील बंधू, भगिनी तसेच बेळगावमधील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाजाने केले आहे.
Belgaum Samadevi Temple Utsav belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Samadevi Temple Utsav
Belgaum Samadevi Temple Utsav
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements