रिंगरोडवर टोल नाका उभारणार व टोल आकारणी
बेळगाव—belgavkar : बेळगावच्या नियोजित रिंगरोडचा (Ringroad) वापर करण्यासाठीही टोल भरावा लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून रिंगरोडची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात ‘रिंग रोड’चे पहिल्या पॅकेजचे जे काम आहे, त्यात एक टोल प्लाझाचाही समावेश आहे. म्हणजे रिंगरोडवर टोल नाका उभारणार व टोल आकारणी केली जाणार हे नक्की आहे. परंतु, हा टोलनाका कोठे उभारला जाणार, हे मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. 22) रिंगरोडसह राज्यातील अनेक कामांचा प्रारंभ होणार आहे. त्या कामाच्या कोनशिलेचे अनावरण केले जाणार आहे. त्यामुळे बेळगावचा रिंगरोड पुन्हा चर्चेत आला आहे. या रिंगरोडची लांबी 34.48 किमी असणार आहे. रिंगरोडसाठी ₹ 1622 कोटी रुपये निधी खर्च केला जाणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दोन महिन्यांपूर्वी रिंगरोडबाबत सुतोवाच केले होते. रिंगरोडचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. बुधवारी अचानक खासदार इरण्णा कडाडी यांच्याकडून कोनशिला समारंभाची माहिती देण्यात आली. तोपर्यंत या कार्यक्रमाबाबत कमालीची गुप्तता ठेवली होती.
बेळगावचा हा नियोजित रिंगरोड चारपदरी असणार आहे. या कामाचा ठेका आधीच ‘मेसर्स जी. आर.इन्फ्रा प्रोजेक्ट्स’ या कंपनीला देण्यात आला आहे. या रिंगरोडमध्ये 4 फ्लायओव्हरही बांधण्यात येणार आहेत. शिवाय या रिंगरोडला तब्बल 41 किमी लांबीचा सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) असणार आहे. एक मोठा पूलही या रिंगरोड निर्मिती वेळी बांधण्यात येणार आहे. लहान आकाराचे 20 पूल बांधण्यात येणार असून, 17 ठिकाणी मोऱ्या बांधण्यात येणार आहेत. अवजड वाहने थांबविण्यासाठी ट्रक ले-बेची निर्मिती केली जाणार आहे.
वाहनचालकांना ज्यादा पैसे मोजावे लागणार : बेळगावात रिंगरोडची मागणी असली तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन नको, अशी भूमिका आहे. हालगा-मच्छे बायपाससाठीही भूसंपादन केल्यामुळे त्याला मोठा विरोध झाला होता. शिवाय न्यायालयाने स्थगिती दिल्याने बायपासचे काम थाबंवावे लागले होते. रिंगरोडच्या विरोधातही 51 जणांनी न्यायालयाची स्थगिती आणली आहे. तरीही या रिंगरोडच्या कामाचा प्रारंभ केला जाणार आहे. रिंगरोडमुळे बेळगाव शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होईल, असा दावा केला जात असला तरी या रिंगरोडच्या वापरासाठी वाहनचालकांना ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत.
Belgaum Ringroad Toll Belagavi belgav belagavi belgavkar explore digital india. Belgaum Ringroad Toll Belagavi
Belgaum Ringroad Toll Belagavi
Belgaum Ringroad Toll Belagavi
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements