बेळगाव—belgavkar : बेळगाव रेल्वेस्थानकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा वर्ष उलटले तरी अद्याप बसविण्यात आलेल्या नाहीत. अनेकवेळा SWR रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवूनदेखील त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने संतप्त झालेल्या शिव व भीम सैनिकांनी बुधवारी बेळगाव रेल्वेस्थानकातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 19 फेब्रुवारीपर्यंत प्रतिमा लावण्याचे अल्टीमेटम देण्यात आले असून प्रतिमा न लावल्यास स्वत: प्रतिमा बसविण्याचा इशारा रेल्वे विभागाला देण्यात आला आहे.
ब्रिटिशकालीन असलेल्या बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. ₹ 190 कोटी रुपये खर्च करून रेल्वेस्थानकाला नवीन रूप देण्यात आले. फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर बेळगावमध्ये घडलेल्या घटना, तसेच क्रांतिकारकांच्या प्रतिमा बसविण्यात आल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा नसल्याने नाराजीचा सूर उमटला होता. तयार करण्यात आलेल्या प्रतिमा अडगळीत ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थान व दलित संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मोठे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रतिमा बसविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. बेळगाव रेल्वेस्थानकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा वर्ष उलटले तरी अद्याप बसविण्यात आलेल्या नाहीत.
Belgaum Railway Station Statue Shivaji Maharaj belgav belagavi belgavkar explore digital india
Belgaum Railway Station Statue Shivaji Maharaj
Belgaum Railway Station Statue Shivaji Maharaj
belgavkar news | digital india
explore digital india | belgaum news
belgaum news
belgavkar advertisement | बेळगावकर जाहिरात
📲 Business Advertisement 📣
- WhatsApp Group : 100 (75k members)
- WhatsApp Channel : 1k followers
- Facebook : 33k followers
- Telegram : 1k subscribers
Call / WhatsApp : 918073540138, 918892211310
Classified Ads : job recruitment / business / property / notice / personal / education / announcements